आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उपवास सोडण्यासाठी मागवले बटर पनीर पण मिळाले बटर चिकन, ग्राहक मंचाने झोमॅटो आणि हॉटेलवर लावला 55 हजारांचा दंड

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- उपवास सोडण्यासाठी एका व्यक्तीने झोमॅटोवरून बटर पनीर ऑर्डर केले, पण त्यांना बटर चिकन डिलिव्हरी झाली. या प्रकारामुळे झोमॅटो आणि हॉटेलला 55 हजारांचा दंड ठोठावण्यात आला आहे. षण्मुख देशमुख असे दंड ठोठावणाऱ्या वकिलाचे नाव आहे. पुण्यातील प्रित पंजाबी स्वाद हॉटेलमध्ये ही घटना घडली आहे. दरम्यान पुण्यातील अतिरिक्त जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाने दंडाची रक्कम 45 दिवसांच्या आत ग्राहकाला देण्याचे आदेश दिले आहे. 


काय आहे प्रकरण ?
अॅडव्होकेट षण्मुख देशमुख हे मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठामध्ये वकील आहेत. मागीलवर्षी 31 मे रोजी 2018 रोजी काही कामानिमित्त ते पुण्याला गेले होते. देशमुख यांच्या त्या दिवशी उपवास होता. त्यामुळे उपवास सोडण्यासाठी त्यांनी झोमेटोद्वारे प्रीत पंजाबी स्वाद हॉटेलमधून त्यांनी पनीर बटर मसाला मागवला होता.

 

थोड्या वेळाने झोमॅटोच्या एका डिलीव्हरी बॉयने त्यांचे पार्सल आणून दिले. त्यांनी जेवणाचे पार्सल उघडले असता, ते पनीर नसून चिकन असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी तातडीने फोन करुन पार्सल देणाऱ्या झोमॅटोच्या डिलीव्हरी बॉयला बोलवले आणि त्याबाबतची माहिती दिली.


त्यानंतर डिलीव्हरी बॉयने यात माझा काहीही दोष नाही. आम्हाला जे पार्सल दिले जाते, ते न उघडता आम्ही संबंधित ग्राहकापर्यंत पोहोचतो असे त्याने सांगितले. नंतर देशमुख यांनी प्रीत पंजाबी स्वाद हॉटेलच्या मॅनेजरशी संपर्क साधला. त्यावेळी मॅनेजरने दुसरे जेवण पाठवत असल्याचे कळवले. पण नंतरही त्या हॉटेलने त्यांना पनीर ऐवजी चिकन पाठवले. यानंतर काही दिवसांनी याप्रकरणी षण्मुख देशमुख यांनी वकील संदेश गुंडगे यांच्याद्वारे झोमॅटो आणि हॉटेलला कायदेशीर नोटीस पाठवली. या नोटीसद्वारे धार्मिक भावना दुखावल्याचे सांगत त्यांनी नुकसान भरपाई देण्याची मागणी केली.


ग्राहक मंचाकडे केली तक्रार
देशमुख यांना प्रीत पंजाबी स्वाद आणि झोमॅटोकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे त्यांनी पुण्यातील ग्राहक तक्रार निवारण मंचाकडे झोमॅटो आणि हॉटेल विरोधात तक्रार दाखल केली. नुकसान भरपाई म्हणून 5 लाख आणि मानसिक त्रासाबद्दल 1 लाख रुपयांची मागणी केली. या प्रकरणी ग्राहक मंचाकडून झोमॅटो आणि पुण्यातील प्रीत पंजाबी स्वाद हॉटेलवर कारवाई करत नुकसान भरपाई म्हणून 50 हजार आणि मानसिक त्रासाबद्दल 5 हजार असा एकूण 55 हजार रुपये दंड ठोठावला आहे. हा दंड 45 दिवसाच्या आत देण्यात यावा असे आदेश दिले आहे.