आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घटस्फोट सुनावणी दरम्यान कोर्टाचा आश्चर्यकारक निर्णय; महिलेला पोटगी नाही तर घरकामाच्या मोबदल्यात पतीकडून मिळवून दिले 1.20 कोटी रूपये

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

खबरे जरा हटके डेस्क - अर्जेंटिना येथील स्थानिक कोर्टाने एका व्यक्तीला आपल्या पदवीधारक पत्नीला 28 वर्षे घरकाम केल्याच्या मोबदल्यात 1.20 कोटी रूपये देण्याच्या आदेश दिला आहे. घटस्फोट सुनावणी दरम्यान कोर्टाने हा आदेश दिला आहे. या वयात महिलेकडे आर्थिक मदतीचा कोणताही स्त्रोत नसल्यामुळे तिला ही रक्कम मिळावी असे कोर्टाचे म्हणणे आहे. 


2011 मध्ये झाला होता घटस्फोट 

> एमएल असे या महिलेचे नाव आहे. तिने अर्थशास्त्र विषयात पदवी धारण केलेली आहे. 1991 मध्ये एमएलचे लग्न झाले होते. लग्नानंतर महिला घर सांभाळेल आणि पती नोकरी करेन असा निर्णय़ दोघांनीही घेतला होता. लग्नाच्या 28 वर्षांनंतर 2009 मध्ये एमएलच्या पतीने वेगळा होण्याचा निर्णय घेतला. 2011 मध्ये दोघांचा घटस्फोट झाला. त्यावेळी एमएल 60 वर्षांची झाली होती. या वयात तिच्याकडे उत्पन्नाचा कोणताही मार्ग नव्हता. तसेच या वयात तिला कोणी नोकरी देत नव्हते. 


> प्रकरण कोर्टात गेले. दरम्यान आर्थिक परिस्थिती खालावली असल्याचे एमएलने न्यायाधिशांना सांगितले. त्यावरून कोर्टाने पत्नीला घरकामाचे पैसे देण्याचा आदेश दिला. जज म्हणाले की, हा निर्णय आश्चर्यकारक आहे. कारण आजही घरकाम करणाऱ्या महिलेला योग्य तो मान-सन्मान दिला जात नाही. त्यांनी केलेल्या कामाकडे दुर्लक्ष केले जाते. 


> जजने निर्णय देताना सांगतिले की, गृहिणींना कोणताही पगार दिला जात नाही. यामुळे सदरील नुकसान भरपाईची रक्कम महिलेची आर्थिक स्थिती आणि तिचे शिक्षण पाहून निश्चित करण्यात आली आहे. जगभरातील 10 सर्वांत विकसीत देशांत महिलांची ही स्थिती आहे.