आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मृत सापासोबत फोटो सोशल मीडियावर टाकला, युजर्सनी वाहिली शिव्यांची लाखोली

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

टेक्सास - अमेरिकेत एका व्यक्तीने लोकांना वॉर्निंग देण्यासाठी फेसबुकवर मृत झालेल्या एका विषारी सापाचा फोटो शेअर केला. ही पोस्ट पाहिल्यानंतर लोक निर्दोष सापाच्या मृत्यूवर राग व्यक्त करू लागले आणि शिव्यांची लाखोली वाहू लागले. यामुळे त्या व्यक्तीने प्रत्युत्तरात एका तरुणाच्या हाताचा फोटोही पोस्ट केला. तो सर्पदंशामुळे जखमी होता आणि मागच्या वर्षभरापासून त्याला एकमागून एक सर्जरी कराव्या लागत होत्या. यानंतर मात्र एकाही प्राणिमित्राची कॉमेंट आली नाही.

 

मृत सापाच्या फोटोमुळे गोंधळ
- टेक्सासचे हे प्रकरण तीन वर्षे जुने आहे. येथे राहणारे म्युझिक स्टार केव्हिन फोलर यांनी एका रॅटलस्नेकला मारून फेसबुकवर त्याचा फोटो शेअर केला होता.
- या फोटोवरून सोशल मीडियावर गोंधळ माजला होता. प्राणीप्रेमी सापाला मारल्याने रागात होते आणि केव्हिनला त्यांनी बरे-वाईट सुनावले.
- एक नाराज युजर म्हणाला की, साप फक्त चावा घेईन या भीतीने त्याला मारणे चुकीचे आहे. एका मुक्या प्राण्यावर हा अन्याय आहे.
- तथापि, फोव्हर यांनी या सापाला आत्मरक्षेसाठी मारले होते आणि या बाबीचा पुरावा देण्यासाठी त्यांनी आपल्या हातांचे फोटोज फेसबुकवर पोस्ट केले.

 

एका वर्षानंतरही आहे दंशाचा परिणाम...
- यात एका फोटोत हातावर काळ्या रंगाचा मोठा फोड दिसत होता. ही सूज एखाद्या काळ्या दगडासारखी दिसत होती. हे सर्पदंशामुळे झाले होते.
- दुसरीकडे, दुसऱ्या फोटोत हातावर दंशाच्या खुणा होत्या. त्या व्यक्तीचा हात एकदम लाल होता आणि तो अतिशय भयंकर दिसत होता.
- फोलर यांच्या मते, साप चावल्यानंतर वर्षभरानेही पीडित व्यक्तीला रिहॅब आणि सर्जरीचा सामना करावा लागत आहे. त्यांच्यासाठी या अपघातातून निघणे कठीण ठरले आहे.
- तथापि, हातांचे फोटोज शेअर केल्यानंतर अॅनिमल अॅक्टिविस्टनी मात्र कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.

 

पुढच्या स्लाइडवर पाहा, या घटनेचे आणखी Photos...  

 

बातम्या आणखी आहेत...