आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दीड वर्ष तरूणीने घातले एक नेकलेस, नंतर त्यात लपलेल्या सत्याने बसला धक्का

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ऑस्ट्रेलिया- प्रेम व्यक्त करण्यासाठी तरूण वेगवेगळ्या युक्त्यांचा वापर करतात. या क्षणाला खास बनवण्यासाठी थे खूप मेहनत देखील घेतात. परंतु, ऑस्टेलियाच्या टॅरीने जे काही केले आहे, ते ऐकून तुम्हाला धक्का बसेल. टॅरीने आपली गर्लफ्रेन्ड अॅनाला अशा प्रकारे प्रपोज केले की ती आयुष्यभर विसरणार नाही. हा त्यांच्या आयुष्यातील सर्वात भावणिक क्षण होता.


आपल्या हाताने बनवले पेंडेंट..
टॅरीने प्रपोज करण्याआधी एका वर्षापूर्वी आपल्या हाताने एका लाकडाच्या दोन तुकड्यांचे लॉकेट बनवले. त्यानंतर त्यांनी त्यात एक मौल्यवान वेडिंग रिंग लपवली होती. सर्वात मजेशीर गोष्ट म्हणजे अॅनाने ही रिंग 18 महिने आपल्या जवळ ठेवली, परंतु तिला त्या रिंगविषयी काहीच माहित नव्हते.


अॅनाला का नव्हते माहित..
टॅरीने एका वर्षापूर्वी आपल्या आपल्या वाढदिवसी अॅनाला एक नेकलेस गिफ्ट केले होते. त्यानंतरच्या वाढदिवसाला नाटक करत आपण नाराज असल्याचे टॅरी म्हणाला आणि नेकलेस काढून टाकण्यास सांगितले. अॅना रडू लागली, ती हैरान झाली. अचनाक टॅरीला काय झाले हे तिला समजले नाही. यानतंर टॅरीने तिचे पेंटेंट तोडून टाकले आणि त्यानंतर जे समोर आले ते पाहून अॅनाला रडू कोसळले.


आणि प्रपोज केले....
पेंडेंटमधून निघालेली रिंग पाहून अॅना हैरान झाली. तिला समाजलेच नाही की, हे काय झाले. त्यानंतर काहीच क्षणात टॅरीने गुडघ्यावर बसून तिला लग्नासाठी प्रपोज केले. 

बातम्या आणखी आहेत...