आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

BF बरोबर लग्न करण्यासाठी विदेशातून आली होती तरुणी, त्याने लग्नाआधीच केला Rape नंतर दिला नकार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

यमुनानगर - हरियाणामध्ये प्रियकराबरोबर लग्न करण्यासाठी विदेशातून आलेल्या तरुणीवर बलात्कार करुन लग्नाला नकार दिल्याचा प्रकार समोर आला आहे. या तरुणीला तिच्या प्रियकराने आधी एंगेजमेंट पार्टीच्या बहाण्याने सोलनला नेऊन रेप केला आणि नंतर लग्नाला नकार दिला. तरुणीने त्याच्यावर केस दाखल केली तर त्याने लग्नाला होकार दिला. पण सुटल्यानंतर पुन्हा त्याने तेच राक्षसी कृत्य केले. 


कारमध्ये नेऊन केला रेप 
लग्नाला तयार झाल्यामुळे तरुणी त्याच्या जाळ्यात अडकली. ती 23 सप्टेंबरला त्याच्याबरोबर कारमध्ये फिरायलाही गेली. पण त्या तरुणाने जुन्या सहारनपूर रोडवर कारमध्येच तिच्यावर पुन्हा बलात्कार केला. त्यानंतर तिला विषही दिली. तिची तब्येत बिघतल्याने नातेवाईकांनी दिला रुग्णालयात दाखल केले. तरुणीने पुन्हा याची तक्रार पोलिसांत दिली आहे. पण तरुणीवर पैसे घेऊन तक्रार मागे घेण्यासाठी दबाव आणला जात असून पोलिसही योग्य तपास करत नसल्याचे तरुणीचे म्हणणे आहे. 


अशी आहे लव्ह स्टोरी...
तरुणीने दिलेल्या तक्रारीनुसार, संबंधित तरुणाच्या दुकानावर तरुणी सामान खरेदी करायला जायची. त्याचठिकाणी त्यांची मैत्री झाली. त्यानंतर तरुणी जॉर्जियाला गेली. पण त्यांच्यात संपर्क कायम होता. त्यादरम्यान तरुणाने तिला लग्नासाठी मागणी घातली. दोन्ही कुटुंबांमध्ये चर्चा झाली लग्नही ठरले. 17 मे रोजी साखरपुडा झाला आणि 13 डिसेंबर ही लग्नाची तारीख ठरली. तरुण एंगेजमेंट पार्टीच्या निमित्ताने तरुणीला सोलनला घेऊन आला. दर रविवारी तो तिला सोबत घेऊन वेगवेगळ्या हॉटेलमध्ये जायचा आणि त्याठिकाणी त्याने रेप केला अशी तरुणीची तक्रार आहे. दरम्यान तरुणाने इच्छा नसल्याचे सांगत तिच्याशी लग्नाला नकार दिला. त्यावर तरुणीने पोलिसांत तक्रार केली. त्यानंतर पुन्हा त्याने तिला जाळ्यात ओढले आणि पुन्हा रेप करत तिला विष दिले. दरम्यान तरुणी प्रचंड धक्क्यात अशून तिचा मोठा विश्वासघात झाल्याचे तिचे म्हणणे आहे. 

बातम्या आणखी आहेत...