Home | Khabrein Jara Hat Ke | Man rapes daughter on his WEDDING NIGHT

वडिलांच्या लग्नात मुलीने परिधान केला नवरीसारखा पोशाख, नशेत असल्यामुळे नातेवाईकांनी झोपवले वधू-वराच्या खोलीत; नंतर घडले असे काही की, पित्याला झाला तुरुंगवास

दिव्य मराठी वेब टीम | Update - Jan 12, 2019, 12:40 PM IST

थोड्या वेळाने खोलीत आलेल्या पित्याने पत्नी समजून मुलीवरच केला बलात्कार

 • Man rapes daughter on his WEDDING NIGHT


  कोपनहेगन : डेन्मार्क येथील कोपनहेगन शहरात एक पित्याने आपल्या लग्नाच्या दिवशी मुलीचा बलात्कार केल्याची घटना घडली होती. त्याने नळकतपणे मुलीला आपली पत्नी समजल्याचे आपला बजावात सांगितले. आपली चूक लक्षात येताच त्याने मेसेज करून मुलीची माफी देखील मागितली होती. वडील आणि मुलीमध्ये मेसेजद्वारे झालेल्या संवादालाच कोर्टाने पुरावा ग्राह्य धरत पित्याला अडीच वर्षाची शिक्षा ठोठावली आहे.

  व्यक्तीच्या एका बाजूला पत्नी तर दुसऱ्या बाजूला होती मुलगी

  > गेल्या वर्षी डेन्मार्कच्या कोल्डिंग शहरात ही घटना घडली होती. येथे राहणाऱ्या 50 वर्षीय व्यक्तीने आपल्याच लग्नाच्या पहिल्या रात्री 20 वर्षीय मुलीचा बलात्कार केला होता. पण हे चूकीने झाल्याने त्याचे म्हणणे होते.

  > पिता आणि मुलगी अनेक वर्षांपासून संपर्कात नव्हते. पण व्यक्तीने आपल्या मुलीला लग्नासाठी आमंत्रित केले होते. मुलगी सुद्धा लग्नाला येण्यास तयार झाली. दोघांची बऱ्याच वर्षांनंतर भेट झाली होती.

  > मुलीने आपल्या वडिलांच्या लग्नात नवरीसारखा पोशाख परिधान केला होता. लग्नामध्ये तिने अतिप्रमाणात दारूचे सेवन देखील केले होते. रात्री 2.30 वाजेच्या सुमारास नशेमध्ये धुंद झाल्यानंतर नातेवाईकांनी तिला जवळच असलेल्या वधू-वराच्या खोलीत नेऊन झोपवले.

  > सकाळी सुमारे चार वाजेच्यासुमारास तिचा पिता देखील आपल्या नववधूसोबत खोलीत येऊऩ पलंगावर झोपला. त्याच्या एका बाजूला पत्नी तर दुसऱ्या बाजूला मुलगी झोपली होती. यादरम्यान त्याने मुलीवर बलात्कार केला.


  नववधूने देखील दिली होती पतीची साथ

  > कोर्टात सुनावणी दरम्यान सांगितले की, सकाळी 4 ते 5 दरम्यान त्याने आपल्या मुलीवर हात टाकला. मुलीने याचा विरोध केला. पण त्याने काही ऐकले नाही आणि मुलीवर जबरदस्ती केली. मुलगी देखील नशेत असल्यामुळे जास्त विरोध करू शकली नाही.

  > घडलेल्या प्रकरानंतर आरोपीने मुलीला मेसेज करत तिची माफी मागितली. पण मुलीने त्यावर प्रत्युत्तर देताना लिहीले की, मी विरोध केल्यानंतरही तुम्ही थांबले नाही. मी तुम्हाला मारहाण देखील केली होती. तरीही तुम्ही थांबले नाहीत.

  > त्यानंर आरोपी लिहीले की, मला माफ कर. हे सर्व काही नळकतपणे झाले. मला वाटले की ती माझी पत्नी आहे. तर दुसरीकडे आरोपीने बजावासाठी कोर्टात सांगितले की, खोलीत गेल्यानंतर पुढे काय झाले याबाबत मला काहीच आठवत नाहीये.

  > आरोपीने आपल्यावर लावलेला बलात्कार आणि यौन शोषणाचे सर्व आरोप स्वीकारण्यास नकार दिला होता. तर त्याच्या पत्नीने देखील पतीचीच साथ दिली होती. आरोपी आणि मुलीमध्ये मेसेजद्वारे झालेल्या संवादाला पुरावा ग्राह्य धरत पित्याला दोषी ठरवले आणि अडीच वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली.

Trending