आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऑपरेशन करून महिलेच्या प्रायव्हेट पार्टमधून काढला स्टीलचा ग्लास; शुद्धीवर येताच मांडली पतीच्या पाशवी कृत्याची हकीगत

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुझफ्फरपूर - येथील सरकारी रुग्णालयात एका महिलेला रक्तरंजित परिस्थित उपचारासाठी दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी तिची अवस्था पाहून वेळीच मेडिकल रिपोर्ट काढल्या तेव्हा त्यांना धक्काच बसला. तिच्या प्रायव्हेट पार्टमध्ये एक लोखंडी ग्लास होता. शस्त्रक्रिया करून तो स्टीलचा ग्लास काढण्यात आला. कित्येक तास बेशुद्ध पडलेल्या महिलेला शुद्ध आली तेव्हा तिने आपल्यावर बेतलेल्या अत्याचाराची हकीगत मांडली. पोलिसांनी तिचा जबाब नोंदवून तिच्या पतीला अटक केली आहे. 


सुरुवातीला पतीने केली पोलिसांची दिशाभूल
पत्नीला गंभीर जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेव्हा तिला नेमके काय झाले आणि तिची ही अवस्था कुणी केली असा प्रश्न सर्वांना पडला होता. पोलिसांनी पतीची चौकशी केली तेव्हा त्याने वेगळीच कहाणी मांडली. शेतात काम करत असताना अचानक तीन नराधमांनी त्यांच्यावर हल्ला केला. तसेच त्याला कथितरित्या एका झाडाला बांधून पत्नीवर सामूहिक बलात्कार केला. यानंतर आरोपी त्याच्या पत्नीला गंभीर जखमी करून घटनास्थळावरून पसार झाले. परंतु, पीडित महिला शुद्धीवर आल्यानंतर क्रूरकर्मा पतीचे पितळ उघडे पडले. 


पीडितेने मांडली हकीगत
पीडित महिला शुद्धीवर येताच तिने आपल्यावर बेतलेल्या अत्याचाराची हकीगत डॉक्टर आणि पोलिसांकडे मांडून पतीने दिलेला जबाब खोटा असल्याचे सांगितले. मुझफ्फरपूरमध्ये राहणाऱ्या पीडितेच्या घरी छठ पूजा निमित्त तिची बहिण प्रसाद घेऊन आली होती. या दरम्यान पती पत्नीमध्ये वाद झाला. पत्नीची बहिण घराबाहेर पडताच त्याने आपल्या पत्नीला खोलीत नेऊन कडी लावली. सुरुवातीला तिला बेदम मारहाण केली. तरीही पतीचा राग शांत झाला नाही. त्याने महिलेवर पाशवी बलात्कार केला. यानंतर खोलीत पडलेला एक स्टीलचा ग्लास तिच्या प्रायव्हेट पार्टमध्ये टाकला. रक्तबंबाळ उठताच पत्नी बेशुद्ध पडली. यानंतर तिला तशाच अवस्थेत सोडून घाबरून तो घराबाहेर पळून गेला. पोलिसांनी पतीला अटक केली असून त्याची कसून चौकशी केली जात आहे.

 

बातम्या आणखी आहेत...