Home | Khabrein Jara Hat Ke | Man rapes own mum and mother in law, shocking revelations in court

आधी आई, मग सासूवर केला बलात्कार, दारुच्या नशेत सैतान बनलेल्या आरोपीने दिले अजब कारण...

दिव्य मराठी वेब टीम | Update - Nov 10, 2018, 12:01 AM IST

कोर्टात सादर केल्यानंतर त्याने जे कारण दिले ते आणखी धक्कादायक आहे.

 • Man rapes own mum and mother in law, shocking revelations in court

  अबुजा - नायजेरियात एका युवकाला आपल्याच आई आणि सासूवर बलात्कार प्रकरणी अटक करण्यात आली आहे. डेव्हिड शेकरी (32) असे नाव असलेल्या या नराधमाने सुरुवातीला त्याची आई झोपेत असताना दारुच्या नशेत तिच्यावर बळजबरी केली. आईला शुद्ध येताच तिने ओरडून शेजाऱ्यांना गोळा केले. तोपर्यंत आरोपी आपल्या सासूच्या घरी फरार झाला होता. त्या ठिकाणी त्याने सासूवर सुद्धा बलात्कार केला. यानंतर सासूच्या कॉलनीतील लोकांनी आरोपीला पकडून बेदम मारहाण केली. यानंतर त्याला पोलिसांच्या हवाली केले. कोर्टात सादर केल्यानंतर त्याने जे कारण दिले ते आणखी धक्कादायक आहे.


  शरीरात प्रेत आत्माने प्रवेश केला होता...
  डेव्हिडने आपल्या कृत्यांची कबुली दिली आहे. परंतु, यासाठी आपण दोषी असल्याचे त्याने नकारले. दारु पिताच आपल्या शरीरात एक आत्मा प्रवेश करतो आणि आपण एक हैवान बनतो. त्याच आत्म्याने माझ्याकडून बलात्कार करून घेतले असा दावा त्याने कोर्टात केला. केवळ घरातच नव्हे, तर बाहेरही त्याने अनेक महिलांवर बलात्काराची कबुली दिली. त्या दिवशी दारु पिल्यानंतर बाहेर कुणीच सापडले नाही. त्यामुळे, घरात आपल्या आई आणि सासूवर पाशवी कृत्य केले असे डेव्हिड म्हणाला.


  आधीच सोडून गेली पत्नी...
  नायजेरियात डेव्हिड एक शेतकरी आहे. त्याला एक पत्नी आणि सुखी संसार होता. परंतु, त्याचे व्यसन आणि पाशवी कृत्ये पाहून पत्नीने घर सोडले आणि दुसऱ्या पुरुषासोबत विवाह केला. डेव्हिडवर कोर्टाने दोन बलात्कारांचे आरोप निश्चित करण्यासह त्याला गुन्हेगार मानले आहे. यानंतर त्याची रवानगी पोलिस कोठडीत करण्यात आली. लवकरच त्याला शिक्षा सुनावली जाणार आहे.

Trending