आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमेरिका : आई-वडिलांनी पाठवलेली अभिनंदनाची तार 50 वर्षांनी मिळाली

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मिशिगन   - अमेरिकेतील मिशिगन येथे राहणाऱ्या ७८ वर्षीय रॉबर्ट फिंक यांनी १९६९ मध्ये पदवी मिळवल्यानंतर त्यांच्या आई-वडिलांनी एक टेलिग्राम पाठवून अभिनंदन केले होते.  हा टेलिग्राम त्यांना तब्बल ५० वर्षांनंतर शनिवारी मिळाला. यासंदर्भात बोलताना रॉबर्ट यांनी सांगितले, त्या वेळी ते मित्रासोबत न्यूयॉर्कमध्ये शिकत होते. त्यांचे आईवडील मिशिगनमध्ये राहत होते. परंतु हा  टेलिग्राम पाहून जुने दिवस आठवले. 


मी भूतकाळात रमलो होतो. आता माझे दोन्ही मित्र हयात नाहीत, याचे दु:ख आहे. माझ्या आई-वडिलांचेही १० वर्षांपूर्वीच निधन झाले आहे. मी माझ्या आई-वडिलांचा कायम ऋणी राहीन. हा टेलिग्राम म्हणजे मला मिळालेला अाशीर्वाद आहे.  


हा टेलिग्राम इतक्या वर्षांनंतर मिळण्याचे कारण, वेस्टर्न युनियन टेलिग्रामने ही सुविधा बंद केली होती. परंतु गेल्या वर्षी ही सुविधा पुन्हा सुरू करण्यात आली. त्यानंतर कंपनीने खूप शोधाशोध केल्यानंतर रॉबर्ट फिंक यांना हा टेलिग्राम पोहोचवण्यात आला.  


इंटरनेटद्वारे शोध  
वेस्टर्न युनियन टेलिग्राम लाँच करणारी क्रिस्टिना जसेक यांनी सांगितले, आम्ही टेलिग्राम पाठवण्याची सुविधा गेल्या वर्षी सुरू केली. सुरुवातीला तर कंपनीत गेलो असता एका ड्रॉवरमध्ये टेलिग्राम पडलेला होता. त्यावर लिहिलेला पत्ता  व रॉबर्ट फिंक यांना इंटरनेटद्वारे शोधले. तेव्हा रॉबर्ट फिंक आता ऑकलँड युनिव्हर्सिटीमध्ये प्राध्यापक आहेत, हे समजले.

बातम्या आणखी आहेत...