आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शरीर संबंधादरम्यान GF ला न सांगताच काढून फेकला कंडोम, नंतर जे झाले त्याने घडली चांगलीच अद्दल

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बर्लिन - जर्मनीच्या एका न्यायालयाने फिजिकल रिलेशनदरम्यान गर्लफ्रेंडला धोका देणाऱ्या एका पोलिसाला 8 महिन्यांची शिक्षा सुनावली आहे. आरोपी पोलिसाचा गुन्हा हा होता की, शारीरिक संबंधांदरम्यान त्याने गर्लफ्रेंडला न सांगता कंडोम काढून टाकला. महिलेचा हे समजताच ती घाबरली आणि तिने लगेचच पोलिसांना फोन केला. त्यानंतर त्या व्यक्तीला बलात्काराच्या आरोपात अटक करण्यात आली. कोर्टने त्याला लैंगिक शोषणाचा दोषी ठरवत 8 महिन्यांची शिक्षा सुनावली. सध्या तो सस्पेंडेड आहे. 


अखेरच्या क्षणी समजले 
- ही घटना जर्मनीची राजधानी असलेल्या बर्लिनमध्ये घडली होती. त्याबाबत सुरू असलेल्या खटल्यात आता कोर्टाने निर्णय सुनावला आहे. आरोपी पोलिस कर्मचाऱ्याचे वय 36 वर्षे आहे. त्याने गर्लफ्रेंडबरोबर शारीरिक संबंध ठेवताना तिना न सांगता कंडोम काढून टाकला होता. 
- याबाबत समजताच महिलेला एवढा राग आला की, तिने पोलिसांना बोलावले आणि आरोपीच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला. 
- फिजिकल होण्यापूर्वीच महिलेने त्याला कंडोम वापरण्यास सांगितले होते. त्या अटीवरच ती यासाठी तयार जाली होती. तरीही त्याने चलाखी करण्याचा प्रयत्न केला तर तिला राग आला. 
- महिलेला अगदी शेवटी याची जाणीव झाल्याने ती घाबरून गेली. लगेचच ती तिथून गेली आणि पोलिसांना फोन केला. लैंगिक आजार आणि प्रेग्नंट होण्याच्या भीतीने ती प्रचंड घाबरली आहे. याबाबत 


भरपूर दंडही ठोठावला 
- बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी पोलिस कर्मचाऱ्याने कोर्टात स्वतःच्या बचावात म्हटले की, कंडोम फाटल्यामुळे त्याने तो काढला होता. 
- दोघांमध्ये सहमतीने सेक्स असल्याने कोर्टाने बलात्काराचा आरोपी ठरवले नाही. पण महिलेला न सांगता कंडोम काढल्याने कोर्टाने त्याला लैंगिक शोषणाचा आरोपी ठरवले. 
- या प्रकरणी कोर्टाने आरोपीला 8 महिन्यांची शिक्षा सुनावली आहे. सध्या तो निलंबित आहे. कोर्टाने त्याला 3 हजार युरो (2.4 लाख रुपये) दंडासह महिलेच्या तपासणीसाठी 96 युरो (7684 रुपये) देण्याचा आदेशही दिला आहे. 

बातम्या आणखी आहेत...