आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मकबऱ्याकडे जाणाऱ्या मुलास लुटले, चोरटा सहा तासांत जेरबंद

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

 औरंगाबाद- लासूर स्टेशनवरुन शहरात येऊन बीबी का मकबरा पाहण्यासाठी जाणाऱ्या अल्पवयीन मुलास मारहाण करुन त्याच्याजवळचे दिड हजार लुटणाऱ्या शेख इरफान शेख बशीर (१९, रा. जयसिंगपुरा) या आरोपीला सीसीटीव्ही व खबऱ्याच्या मदतीने पोलिसांनी अवघ्या सहा तासात अटक केली. 


अमोल (१६, रा. लासुर स्टेशन) हा वडिलांसाेबत सोमवारी दुपारी शहरात आला होता. त्याला मोबाईल खरेदी करायचा होता. परंतू वडिलांचे काम असल्याने तुम्ही काम करुन या तोपर्यंत मी बीबी का मकबरा पाहून येतो, असे म्हणून तो एकटाच बेगमपुरा परिसराकडे गेला. परंतु नेमके ठिकाण माहीत नसल्याने त्याने पायी जाणाऱ्या इरफानला बीबी का मकबरा कुठे आहे, असे विचारले. तो एकटा असल्याने पाहून इरफानने त्याला चल मकबरा दाखवतो, असे म्हणत बेगमपुरा स्मशानभुमीकडे नेले. मारहाण करुन त्याच्याजवळील १६५० रुपये हिसकावून घेत पळ काढला. घाबरलेल्या अमोलने हा प्रकार वडिलांना सांगितला. नंतर दोघांनी बेगमपुरा पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली. गुन्हे शाखा व बेगमपुरा पोलिसांनी तत्काळ रस्त्यावरील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता त्यात इरफान कैद झाला होता. खबऱ्याची मदत घेत इरफानला विद्यापीठातील वसतीगृहाजवळून अटक केली. गुन्हे शाखेचे निरीक्षक मधुकर सावंत, बेगमपुरा पोलिस ठाण्याच्या निरीक्षक राजश्री आडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक एन. बी. शिंबरे, गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक नंदकुमार भंडारी, विकास माताडे, विलास वाघ, धर्मराज गायकवाड, ओमप्रकाश बनकर यांनी ही कारवाई केली. 

 


घरातून अडीच हजार रोख, मोबाइल लांबवला : एसटी कॉलनीत राहणाऱ्या अश्विनी भीमराव खरात (२४) यांच्या घरात ठेवलेल्या पर्समधून चोरांनी अडीच हजार रुपये रोख व मोबाइल व चार्जर असा एकूण १८ हजार रुपयांचा ऐवज चोरुन नेला. 
 

बातम्या आणखी आहेत...