Home | Khabrein Jara Hat Ke | Man Sells Pickled Human Body Parts & Weird, Scary Items, Inside SCARY shop

मानवी अंगांचे लोणचे बनवून विकतो हा दुकानदार; हात, पायांसह महिलांचे अंगही उपलब्ध! सरकारने दिली परवानगी

दिव्य मराठी वेब टीम | Update - Feb 13, 2019, 12:48 PM IST

या दुकानाचे नाव क्यूरिॉसिटीज फ्रॉम द फिफ्थ कॉर्नर (Curiosities from the 5th Corner) असे आहे.

 • Man Sells Pickled Human Body Parts & Weird, Scary Items, Inside SCARY shop

  लंडन - येथील एसेक्स परिसरात इतके विचित्र आणि भयावह दुकान आहे की अनेकांना तेथे जाण्याचीही भीती वाटते. दुकानात प्रवेश करताच अगरबत्ती आणि धूपचा सुगंध दुसऱ्याच जगात घेऊन जातो. त्यात धुरामध्ये चक्क मानवी अंग विविध प्रकारच्या काचेच्या बरण्यांमध्ये दिसून येतील. मुळात या दुकानात प्रवेश करण्यासाठी मोठे काळीज लागते. दुकानदाराने या सर्वच बाटल्या आणि बरण्यांमध्ये मानवी शरीराचे विविध अंग लोणच्याच्या स्वरुपात संग्रहित ठेवले आहे. विशेष म्हणजे, त्याने या गोष्टी लोकांना फक्त दाखवण्यासाठी ठेवलेल्या नाहीत तर प्रत्येक अंगाची एक विशिष्ट अशी किंमत आहे.


  एसेक्समध्ये असलेल्या दुकानाचे नाव क्यूरिॉसिटीज फ्रॉम द फिफ्थ कॉर्नर (Curiosities from the 5th Corner) असे आहे. दुकानाचा मालक हेनरी स्क्रॅग यामध्ये मानवी शरीराच्या अंगांसह विविध प्रकारच्या जनावरांचे अंग सुद्धा ठेवत असतो. या सर्वच विचित्र गोष्टींची किंमत 900 रुपयांपासून 2.5 लाख रुपयांपर्यंत आहे. हेनरीने आपल्या दुकानात महिलांचे अंग सुद्धा साठवून ठेवले आहेत. त्यामध्ये गर्भ, ओव्हरी आणि इतर गोष्टींचा समावेश आहे. एका व्यक्तीला कर्करोग झाल्यानंतर त्याचा हात कापावा लागला. तो हात सुद्धा हेनरीने आपल्या दुकानात संग्रहित करून विक्रीसाठी लावला आहे. यामध्येच एका मृत अर्भकाला सुद्धा बाटलीतच ठेवण्यात आले आहे.


  हे आहे विचित्र दुकान लावण्याचे कारण
  हेनरीने सांगितल्याप्रमाणे, काही लोकांना माझ्या कामाची पद्धत आणि संकल्पना भयभीत करणारी किंवा चुकीची वाटू शकते. पण, मला वाटते की आपण अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या कधी पाहिलेल्या नाहीत. मृत्यू झाल्यानंतर लोकांना दफन केले जाते किंवा अंत्यसंस्कार केले जातात. मानवी शरीराचे अंग जवळून कसे दिसतात हे आपल्याला एकाच छताखाली पाहायला मिळतील असे हे दुकान आहे. केवळ पाहणेच नव्हे, तर लोकांना आवडल्यास ते खरेदी सुद्धा करू शकतात.


  परवनागी घेऊनच उघडले दुकान
  ब्रिटनमध्ये अशा प्रकारचे दुकान सुरू आहे आणि कुणी आक्षेप कसा घेतला नाही असा प्रश्न अनेकांना पडला असावा. परंतु, हेनरीने वैद्यकीय मंडळाच्या परवानगीनंतरच हे दुकान उघडले आहे. यात लावलेले अनेक मानवी अंग तर विविध रुग्णालयांनी दान केलेल्या मृतदेहांतून काढण्यात आले आहेत. त्यातून काढलेले अंग फॉर्मलडिहाइड मध्ये बु़डवले जातात. जेणेकरून मानवी अंगाचे टिशू खराब होण्याची प्रक्रिया बंद होते. यानंतर तो हे अंग अल्कोहोलमध्ये बुडवतो. तरीही अंगांना नेहमीच सुरक्षित ठेवण्यासाठी वेळोवेळी लिक्विड बदलावा लागतो असे हेनरीने सांगितले आहे.

 • Man Sells Pickled Human Body Parts & Weird, Scary Items, Inside SCARY shop
 • Man Sells Pickled Human Body Parts & Weird, Scary Items, Inside SCARY shop
 • Man Sells Pickled Human Body Parts & Weird, Scary Items, Inside SCARY shop
 • Man Sells Pickled Human Body Parts & Weird, Scary Items, Inside SCARY shop
 • Man Sells Pickled Human Body Parts & Weird, Scary Items, Inside SCARY shop

Trending