Home | National | Other State | man shot dead on bhaiyadooj in fulwarisharif bihar

भाऊबीजेच्या दिवशी पाहात होती भावाची वाट, नंतर मृतदेहाला ओवाळून दिला अंतिम निरोप

दिव्य मराठी वेब टीम | Update - Nov 10, 2018, 03:56 PM IST

पैशाच्या वादातून गावातील काही लोकांनी हत्या केली होती.

 • man shot dead on bhaiyadooj in fulwarisharif bihar

  फुलवारीशरीफ- पैशाच्या वादातून शुक्रवारी सकाळी बिहारच्या फुलवारीशरीफच्या सरपंच आभा देवी यांचे भाऊ हेमंत उर्फ बबलू शर्मा(42) यांची हत्या करण्यात आली. त्यांच्याच घराच्या बाहेर गोळ्या घालून त्यांना ठार करण्यात आले. कुटुंबीयांनी त्यांच्याच गावातील संतोष सिंग, संटू सिंग आणि मंटू सिंग यांच्यावर हत्तेचा अरोप केला आहे.

  दिवसभर घरातच होता वडिलांचा मृतदेह
  बबलू शर्माने महानंद सिंगचा मुलगा संतोष सिंगला 3 लाख रूपये कर्ज दिले होतेे. वडिलांच्या मृत्यूची बातमी एेकताच संतोष त्याच्या भावासोबत संटूच्या घरून वापस येत होता. तेव्हा त्याला रस्त्यात बबलू भेटला, त्यांच्यात पैशावरून वाद सुरू झाला. त्यानंतर बबलूची हत्या करण्यात आली. त्याच्या छातीत जवळून दोन गोळ्या घालण्यात आल्या. हत्येनंतर तिन्ही आरोपी फरार असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.

  शकडो लोकांचा पोलिसांसमोर गोंधळ
  बबलूच्या हत्येनंतर कुटुंबीयांनी एकच गोंधळ केला. घटनास्थळी पोलिसांना जिवंत काडतूस सापडले. पोलिसांनी आरोपींना पकडण्यासाठी परिसरात नाकेबंदी केली आहे. आरोपींना लवरात लवकर पकडण्यात येईल या आश्वासनानंतर लोक शांत झाले.

  बहिणीने मृतदेहाला ओवाळले
  भाऊबीजेच्या तयारीतील सरपंच आभा देवी भावाची वाट पाहात होत्या, तेव्हाच त्यांच्या खुनाची बातमी ऐकुन त्यांच्या पायाखालची जमीन हदरली. पतीसह त्या माहेरी आल्या. भावाचा मृतदेह पाहून चक्कर येऊन पडल्या. पण कुटुंबीयांनी त्यांना सांभाळले. नंतर भावाला ओवाळून अंतिम निरोप दिला.

Trending