आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिलेने पार्टीत येण्यास दिला नकार, तरूणाने महिलेच्या 10 महिन्यांच्या चिमुकलीच्या डोक्यात मारली गोळी

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वाशिंग्टन- येथील एका तरुमाला एका महिलेच्या 10 महिन्यांच्या मुलीला यामुळे गोळी मारली, कारण त्या महिलेने आरोपी तरुणाला पार्टीत येण्यापासून रोखले. घटना कॅलिफोर्नियात घडली आहे. वाशिंग्टन पोस्टमध्ये आलेल्या बातमीनुसार पोलिसांना घटनेची माहिती मिळताच, त्यांनी जखमी मुलीला रूग्णालयात दाखल केले आहे. फ्रेसनो पोलिस विभाग प्रमुख जेरी डायरने सांगितल्यानुसार वीकेंडवर होत असलेल्या या पार्टीमध्ये 23 वर्षीय आरोपीने अचानक गोळीबार सुरू केला. यादरम्यान एक गोळी मुलीच्या डोक्यात लागली आणि ती गंभीररित्या जखमी झाली. 

 
पोलिसांनी सांगितल्यानुसार आरोपी तरुणाची आणि मुलीच्या आईची एका आठवड्यांपूर्वीच ओळख झाली होती. पण त्यानंतर त्यांच्यात काहीच बोलणे झाले नाही. त्यानंतर महिलेच्या घरात सुरू असलेल्या पार्टीत आरोपी तरुणाने येण्याचा प्रयत्न केला, पण महिलेने त्याला रोखल्यावर आरोपीने गोळीबार सुरू केला. 

 

पोलिसांनी सांगितल्यानुसार आरोपी तरुण आणि मुलीच्या आईमध्ये कोणतेच नाते नाहीये. आतापर्यंत केलेल्या तपासात हे समोर आले आहे की, त्या आरोपीला महिलेसोबत नात्यात यायचे होते, त्यामुळेच तो महिलेच्या घरी गेला होता. पोलिस सध्या या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत.