आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Man Sleep On Railway Track, Train Passed Over The Passenger In Faridabad

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

4 मिनीटात ट्रेनचे 55 डब्बे अंगावरून गेले, तो ट्रॅकवर झोपी गेला, मुले आणि पत्नी पाहत होते हे भयानक दृश्य...

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

फरीदाबाद(हरियाणा)- ज्याला देव तारी त्याला कोण मारी…। ही म्हण शनिवारी रात्री ओल्ड फरीदाबाद रेल्वे स्टेशनवर खरी ठरली. स्टेशनच्या लूप लाइनवर उभी असलेली मालगाडी सिग्नल मिळताच 10 ते 15 किलोमीटरच्या वेगाने सुरू झाली. 55 डब्ब्यांची ही गाडी एका व्यक्तीच्या वरून गेली पण त्याला साधे खरचटले सुद्धा नाही.


पत्नी आणि मुलांसमोर घडला हा प्रकार
प्लॅटफार्मवर बसलेले पत्नी आणि मुले हे भयानक दृश्य पाहत होते, पण तरिही काहीच करू शकले नाही. तो व्यक्ती लघवी करण्यासाठी ट्रेनच्या खाली गेला होता, त्या दरम्यान गाडी निघाली. गाडी गेल्यावर व्यक्ती उठला आणि बायको आणि मुलांना मिठी मारून रडु लागला. मथुराच्या कोटवन मध्ये राहणारा विजय कुमारने पुन्हा आयुष्यात अशी चुक कधीच करणार नाही असे सांगितले. विजय आपला मोठ्या मुलाचा वाढदिवस साजरी करण्यासाठी संतनगरला आला होता. कार्यक्रम संपल्यानंतर तो असलटीला निघाला. 


लूपलाइनवर उभ्या असलेल्या ट्रेनखाली लघवी करण्यासाठी गेला.
मंगळवारा रात्री 8.42 वाजता हजरत निजामुद्दीनवरून निघालेली मानिकपूरला जाणारी 12448 यूपी संपर्क क्रांति एक्सप्रेस ओल्ड फरीदाबाद स्टेशनवरून जाणार होती. त्याला पास करण्यासाठी स्टेशन मास्टरने तुगलकाबाद वरून नाशिकला जाणारी मालगाड़ीला अप लूपलाइनवर 8.38 वाजता उभी केली. यूपी संपर्क क्रांति गेल्यानतंर प्लॅटफार्म नंबर तीनवर कुटंबासोबत विजय बसला होता, त्यानंतर तो गाडीखाली लघवी करण्यासाठी गेला. 8.45 ला गाडीला सिग्नल मिळाल्यानंतर गाडी निघाली आणि त्याला बाहेर येता आले नाही.


प्रवाशांनी त्याला झोपण्याचा सल्ला दिला
गाडी सुरू होताच इतर प्रवासी आणि त्याचा पत्नीचा श्वास थांबला, तिने आरडा ओरड सुरू केली. इतर प्रवाशांनी त्याला ट्रॅकवर झोपण्याचा सल्ला दिला. त्यानंतर तो झोपला आणि गाडी त्याच्यावरून निघून गेली पण त्याला साधे खरचचले सुद्धा नाही.