• Home
  • man stuck in cave, rescued after 4 days in kambodia

आंतरराष्ट्रीय / वटवाघुळांचे मल-मुत्र जमा करण्यासाठी गेलेला तरुण गुफेत अडकला, चार दिवसानंतर वाचवल्यावर या अवस्थेत होता


तो म्हणाला- जर माझ्याकडे चाकू असता, तर मी आत्महत्या केली असती

दिव्य मराठी वेब

Sep 19,2019 12:17:15 PM IST

नॉम पेन्ह- गुफेत अडकलेला कंबोडियाचा 28 वर्षीय तरुण सुम बोराला चार दिवसानंतर वाचवण्यात यश आले. त्याला रॅपिड रेस्क्यू कंपनी 711 च्या 200 जवानांनी दगडं कापून वाचवले. हा तरुण उर्वरक बनवण्यासाठी वटवाघुळांचे मल-मुत्र जमा करण्यासाठी 4 ऑगस्टला गुफेत गेला होता. टॉर्चलावताना त्याचा पास घसरुन तो दगडांमध्ये अडकला.


तीन दिवस घरी न परतल्याने त्याच्या भानाने चौथ्या दिवशी उत्तर पश्चिमच्या बट्टमबांगच्या पर्वतावरील जंगलात त्याचा शोध घेतला. या दरम्यान त्याला तो दगडांमध्ये अडकलेला आढळला. त्यानंतर त्याने बचाव अधिकाऱ्यांना याची माहिती दिली. अधिकाऱ्यांनी मोठ्या शिताफीने दगड कापून त्याला बाहेर काढले. 4 ऑगस्ट ते 7 ऑगस्टदरम्यान तो दगडांमध्ये अडकलेला होता. हॉस्पीटलला नेताना तो म्हणाला, "जी जिवंत राहण्याची आशा सोडली होती. जर माझ्याकडे चाकू असता, तर मी आत्महत्या केली असती."

सगळ्यात गरीब देशांपैकी एक आहे कंबोडिया
युनायटेड नेशनच्या रिपोर्टनुसार, कंबोडिया जगातील सर्वात गरीब देशांपैकी एक आहे. देशाची 35% नागरिक गरीब आहेत. त्यामुळे येथील अनेक शेतकरी वटवाघुळांचे मल-मुत्र खाद्य बनवण्यासाठी वापरुन पैसे कमवतात.

X
COMMENT