आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनेक दिवस प्रयत्न करूनही पत्नी होत नव्हती प्रेग्नंट, त्यानंतर त्याने शेजाऱ्याला सांगितली अडचण.. मग शेजाऱ्यावरच केली केस

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बर्लिन - या जगात अनेक विचित्र प्रकारचे खटले चालवले जात असतात. अशा खटल्यांबाबत अनेकदा जजेसचे आश्चर्यकारक निकालही येत असतात. अशाच एका खटल्याबाबत आपण आज जाणून घेणार आहोत. हा खटला जर्मनीमधील असून 2011 चा आहे. येथे एका व्यक्तीने त्याच्या शेजाऱ्यावर खटला केला होता. शेजाऱ्याने पत्नीला प्रेग्नंट केले नाही असा आरोप त्याच्यावर करून नुकसान भरपाईची मागणी केली होती. या प्रकरणात जजने शेजाऱ्याचा दोषी ठरवत या व्यक्तीच्या बाजुने निर्णय दिला होता. 


काय होते प्रकरण.. 
- जर्मनीच्या राहणाऱ्या दामेत्रियस सोपोलोस अनेक वर्षे त्याच्या ब्युटी क्वीन राहिलेल्या पत्नीला प्रेग्नंट करण्याचा प्रयत्न करत होता. पण त्याला त्यात यश मिळत नव्हते. त्यामुळे त्याने वैद्यकीय तपासणी केली. त्यात बाळ जन्माला घालणे त्याला शक्य नसल्याचे समोर आले. पण दामेत्रियसच्या पत्नीला कोणत्याही स्थितीत बाळ हवे होते. 
- यानंतर कपलने बाहेरच्या एखाद्या व्यक्तीमार्फत बाळ जन्माला घालण्याचा निर्णय घेतला. त्यांना त्यांचा एक शेजारी फ्रँक मोज योग्य वाटला. त्याला आधीच गोन मुले होती. त्या व्यक्तीने शेजाऱ्याबरोबर सहा महिन्यांसाठी अडीच हजार डॉलर म्हणजे 1.75 लाखांचा कॉन्ट्रॅक्ट केला. या काळात शेजाऱ्याने पत्नीशी संबंध ठेवून तिला प्रेग्नंट करायचे असे ठरले. शेजाऱ्यानेही याला होकार दिला. 


नंतर आले वेगळेच वळण 
- दामेत्रियसने शेजाऱ्याबरोबर आठवड्यातील तीन रात्री पत्नीला राहू दिले. सहा महिने हे चालत राहिले. 72 वेळा प्रयत्न करूनही फ्रँक मोज त्याच्या पत्नीला प्रेग्नंट करू शकला नाही. त्यामुळे त्याला संशय आला. 
- फ्रँकने मेडिकल चेकअप केले तर त्यात तोही बाळ जन्माला घालण्यास सक्षम नसल्याचे समोर आले. विशेष म्हणजे रिपोर्ट आल्यानंतर मोजच्या पत्नीने हे गुपीत उघड केले की, तो तिच्या दोन मुलांचा खरा पिता नाही. 
- यानंतर दामेत्रियसने फ्रँककडून पैसे परत मागितले. त्याने पैसे द्यायला नकार दिला. पैसे घेताना पत्नी प्रेग्नंट होईल असे वचन दिले नसल्याचे तो म्हणाला. त्यानंतर कोर्टाने फ्रँकला या व्यक्तीचे पैसे परत करण्याचा आदेश दिला. 

बातम्या आणखी आहेत...