आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पत्नीच्या चारित्र्यावर संशय व वागणे पटत नसल्यामुळे पतीची गळफास घेत आत्महत्या

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

खुलताबाद- कसाबखेडा परिसरात एका ३५ वर्षीय व्यक्तीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. मृताच्या खिशात चिठ्ठी सापडली असून त्यात पत्नीच्या चारित्र्यावर संशय व पत्नीचे वागणे पटत नसल्याचे नमूद केले आहे. 

 

हरी आसाराम इंगळे (रा. शहर पळशी, ता. औरंगाबाद) असे मृताचे नाव असून खुलताबाद पोलिसात आकस्मिक नोंद केली आहे. कसाबखेडा परिसरात जितेंद्र माळू यांच्या शेतात एका बोरीच्या झाडाला एका व्यक्तीने गळफास घेतल्याचे शेतात कामासाठी जात असलेल्या कामगाराला बुधवारी सकाळी सातच्या सुमारास नजरेस पडले. हरी इंगळे हा एक दिवसापूर्वी आपल्या पत्नीला खुलताबाद तालुक्यातील गदाना येथे माहेरी सोडून आपल्या मोटारसायकलवर गेला होता. हरीने ज्या ठिकाणी गळफास घेतला.