आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आईसमोरच विहिरीत उडी घेऊन मुलाची आत्महत्या

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - आई समोर बसलेली असताना एका तरुणाने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी (दि.१२) सायंकाळी ५.३० वाजता घडली. याप्रकरणी नशिराबाद पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

जितेन सुकराम ठाकूर (२५, मूळ रा. चिरिया, मध्य प्रदेश) असे मृत तरुणाचे नाव आहे. जितेन हा कडगाव (ता. जळगाव) येथील सुरेश नथ्थू पाटील यांच्या शेतात गेल्या १५ वर्षांपासून आई व भाऊ यांच्यासोबत राहत होता. याच शेतात त्यांचे कुटंुब मजुरीचे काम करत आहे. रविवारी सुटीचा दिवस असल्याने मालक पाटील यांनी सर्वांचे पगार दिले होते. त्यानंतर सायंकाळी ५.३० वाजता जितेन हा दारू पिऊन आला होता. त्याची आई भुलाबाई घरासमोर बसलेली असताना जितेन मोबाइलवर बोलत विहिरीकडे गेला. काही सेकंदातच जितेन याने २० फूट खोल विहिरीत उडी घेतली. आईच्या लक्षात आल्यानंतर तिने आरडाओरड केली. सोमवारी सकाळी आठ वाजता जितेनचा मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात आला. दरम्यान, डोक्यास गंभीर दुखापत झालेली असल्याने त्याचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी पोलिस  तपास करत  आहेत.

बातम्या आणखी आहेत...