Home | International | Other Country | Man Survives stroke thanks to alert new puppy

ज्या श्वानाला घरी आणले, तो आवडत नव्हता, परत करणार तेवढ्यात एका रात्री झाला अनर्थ

दिव्य मराठी वेब टीम | Update - Sep 12, 2018, 10:10 AM IST

अमेरिकेतील रहिवासी एक बुजुर्ग व्यक्ती आपल्या घरी नवा डॉगी घेऊन आला. परंतु ते इम्प्रेस झाले नाहीत.

 • Man Survives stroke thanks to alert new puppy

  सँडी - अमेरिकेतील रहिवासी एक बुजुर्ग व्यक्ती आपल्या घरी नवा डॉगी घेऊन आला. परंतु ते इम्प्रेस झाले नाहीत. त्यांनी एकाच आठवड्यात त्याला परत करण्याचे ठरवले. यादरम्यान त्यांना रात्री झोपताना अचानक हार्ट अटॅक आला. बाजूला झोपलेली त्यांची पत्नी यापासून अनभिज्ञ होती. परंतु श्वानाने पत्नीला ताबडतोब अलर्ट केले. यामुळे त्यांना ताबडतोब हॉस्पिटलला नेण्यात आले आणि पतीचा जीव वाचू शकला. जेव्हा बुजुर्ग व्यक्ती ठीक होऊन घरी परतले, तेव्हा कुटुंबाला श्वानाच्या समजूतदारपणाची जाणीव झाली आणि त्याला त्याच घरात कायमची जागा मिळाली.

  श्वानाने असे केले अलर्ट
  - ही घटना मागच्या वर्षीची आहे. उटाहमधील सँडीचे रहिवासी 82 वर्षीय जिम कूपर आपल्या घरी 7 महिन्यांचा श्वान घेऊन आले होते. तथापि, त्याच आठवड्यात त्यांनी त्याला परत करण्याचा निर्णय घेतला होता.
  - जिम यांना श्वानाला परत करण्याच्या आदल्या रात्री झोपेत जोरदार अटॅक आला. ते झोपेत होते आणि जवळच त्यांचीपत्नी ज्यूडी झोपलेली होती. तिला या अटॅकची माहिती नव्हती.
  - तेव्हा त्यांचा नवा डॉगी त्यांच्या छातीवर येऊन बसला आणि रडू लागला. ज्युडी यांनी रडण्याचा आवाज ढेकला तेव्हा त्यांना वाटले की त्या एखादे वाईट स्वप्न पाहत आहेत आणि त्या झोपेत रडत आहेत.
  - ज्युडी यांनी पती जिमला आवाज दिला, परंतु काहीच उत्तर मिळाले नाही. परंतु त्यांनी रूमचा लाईट लावला तेव्हा त्यांना डॉगी त्यांच्या पतीच्या छातीवर बसून रडताना दिसला.
  - त्यांनीला जिमला उठवण्याचा प्रयत्न केला, परंतु ते उठले नाही. यामुळे ज्युडीला काही अनर्थ झाल्याची जाणीव झाली. त्यांनी ताबडतोब अॅम्ब्युलेन्स बोलावली आणि पतीला हॉस्पिटलमध्ये पोहोचवले.
  - डॉगीच्या समजूतदारपणामुळे वेळेवर पतीला उपचार मिळाले आणि त्यांचा जीव वाचला. डॉक्टर म्हणाले की, झोपेत हार्ट अटॅक आल्यास जीव वाचणे कठीणच असते.

  कुटुंबाला कळली श्वानाची किंमत
  - तोपर्यंत जूडीला कळून चुकले होते की, जर त्यांचा नवा श्वान घरात नसता तर त्यांच्या पतीचा जीव वाचणे अवघड होते.
  - तब्येत बरी झाल्यावर जिम यांना जेव्हा शुद्ध आली तेव्हा पत्नी ज्युडीने श्वानाच्या समजूतदारपणाची कहाणी त्यांनाही ऐकवली.
  - जिम यांनी तत्क्षणीच श्वानाला परत करण्याचा विचार काढून टाकला. तंदुरुस्त झाल्यावर हॉस्पिटलमधून परतून त्यांनी श्वानासाठी घरातच राहण्याची जागा तयार केली.

  पुढच्या स्लाइडवर पाहा, जिम व ज्युडीसोबत या श्वानाचे आणखी Photos...

 • Man Survives stroke thanks to alert new puppy
 • Man Survives stroke thanks to alert new puppy
 • Man Survives stroke thanks to alert new puppy

Trending