आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवीन डॉगी घरी घेऊन आले एक वृद्ध, आठवड्याभरातच करणार होते परत पण अचानक एके रात्री घडली भयानक घटना

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमेरिकेत राहणारे एक वृद्ध त्यांच्या घरी नवीन डॉगी घेऊन आले. पण ते त्या डॉगीमुळे इम्प्रेस झाले नाहीत आणि आठवड्याभरातच त्यांनी त्याला परत करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान एकेरात्री झोपेतच त्यांना अचानक हार्ट अटॅक आला. शेजारी झोपलेली त्यांची पत्नी यापासून अनभिज्ञ होती. पण डॉगीने त्यांच्या पत्नीला झोपेतून उठवले. तेव्हा कुटुंबीयांना डॉगीच्या समजूतदारपणाची जाणीव झाली आणि त्याला कायमचे आपल्या जवळ ठेऊन घेतले.  

 

डॉगीने फॅमिलीला केले अलर्ट

- ही घटना गेल्यावर्षीची आहे. सँडी येथे राहणारे 82 वर्षीय जिम कूपर त्यांच्या घरी सात महिन्यांच्या एका डॉगीला घेऊन आले. पण आठवड्याभरात त्यांनी त्याला परत करणअयाचा निर्णय घेतला.
- डॉगीला परत करण्याच्या आधीच एका रात्री त्यांना झोपेत हृदयविकाराचा धक्का आला. पण त्यांच्या शेजारी झोपलेल्या त्यांच्या पत्नीला याविषयी काहीच कल्पना नव्हती. 
 - तेव्हा त्यांचा डॉगी तिथे आला आणि तो त्यांच्या शेजारी बसून रडू लागला. डॉगीचा आवाज ऐकून जिमच्या पत्नी जूडी जाग्या झाल्या आणि पतीला न उठलेले बघून त्यांना उठवण्याचा प्रयत्न केला. 
- जूडी यांना काही तरी अघटीत घडत असल्याची जाणीव झाली आणि त्यांनी तत्काळ अॅम्बुलन्स बोलावली आणि पतीला हॉस्पिटलमध्ये नेले.
- डॉगीच्या समजूतदारपणामुळे जिम यांना योग्य वेळी उपचार मिळाले आणि त्यांचा जीव वाचला. डॉक्टरांनी जूडी यांना सांगितल्याप्रमाणे, झोपेत हार्ट अटॅक आलेला माणूस क्वचितच वाचतो.

 

फॅमिलीला कळली डॉगीची किंमत...

- जूडी यांना त्यांच्या डॉगीची किंमत समजली असून जर त्यांच्या पतीने त्याला घरी आणले नसते, तर कदाचित ते वाचू शकले नसते.

- बरे झाल्यानंतर जेव्हा जिम यांना त्यांच्या डॉगीविषयी समजले, तेव्हा त्यांनी त्याला परत न करण्याचा निर्णय घेतला. 

बातम्या आणखी आहेत...