आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Man Swallowed Toothbrush To Commit Suicide, Doctors Removed After 20 Years

आत्महत्या करण्यासाठी तरुणाने गिळला टूथब्रश, डॉक्टरांनी 20 वर्षानंतर ऑपरेशन करुन काढला

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

बीजिंग- चीनमधील एका रुग्णालयात डॉक्टरांनी रुग्णाच्या आतड्यातून टुथब्रश काढला, जो त्याने 20 वर्षांपूर्वी आत्महत्या करण्यासाठी गिळला होता. गुआंगडोंग राज्यातील शेनजेन शहरातील रुग्णालयात काही दिवसांपूर्वी हे प्रकरण समोर आले. डॉक्टरांनी सांगितले की, आतापर्यंत त्यांच्याकडे अनेक अशाप्रकारची प्रकरणी आली आहेत, ज्यात रुग्णाच्या पोटातून नाणे, लायटर, कात्री किंवा इथर धातू निघाले. पण टुथब्रश निघण्याची ही पहिलीच वेळ आहे, पण हे प्रकरण वेगळे आहे. या प्रकरणात रुग्णाने आत्महत्या करण्यासाठी स्वतःहून हा टुथब्रश गिळला होता.


51 वर्षीय रुग्णाचे नाव ली आहे. त्याने जून महिन्यात आपल्या पोटात दुखत असल्याने रुग्णालात तपासणी केली होती. डॉक्टरांनी त्याच्या पोटाचे स्कॅन केल्यावर त्यांना पोटातील लहान आतड्यात टुथब्रश आढळला.

कौटुंबीक जीवनात व्यस्त झाल्यामुळे टुथब्रशबद्दल विसरला होता
डॉक्टरांनी याबाबत विचारल्यावर त्याने सांगितले की, "हा बहुदा 20 वर्षे जुना टुथब्रश आहे, आत्महत्या करण्यासाठी मी तो गिळला होता."  खरतर त्यावेळी ली एचआयव्ही पॉझिटीव्ह होता आणि तणावात येऊन त्याने हे पाऊल उचलले होते. आत्महत्या करण्याची योजना अयशस्वी झाल्यावर त्याने टुथब्रश गिळला. विशेष म्हणजे हा टुथब्रश त्याच्या आतड्यात जाऊन बसला आणि इतक्या वर्षे त्याला काहीच त्रास झाला नाही. 

2014 पासून त्याच्या पोटात त्रास सुरू झाला. त्यानंतर अनेकवेळा औषध घेऊनही त्रास बरा होत नव्हता म्हणून त्याने डॉक्टरांना दाखवले आणि पोटाचे स्कॅन करुन घेतले. त्याने सांगितले की, "टुथब्रश गिळल्यानंतर माझा जीव गेला नाही. त्यानंतर मी एचआयव्हीचे औषध घेणे सुरू केले आणि तुरुंगातून बाहेर आल्यावर लग्न केले. त्यानंतर दोन मुले झाली आणि टुथब्रशबद्दल विसरुन गेलो."