आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

MUMBAI: फोन चार्ज करण्‍यासाठी जबरदस्‍ती विमानाच्‍या कॉकपिटमध्ये घुसत होता युवक, थोडक्‍यात टळला अनर्थ

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - मुंबई एअरपोर्टवर इंडिगो एअरलायन्‍सच्‍या एका फ्लाईटमध्‍ये युवकाने जबरदस्‍तीने कॉकपिटमध्‍ये शिरण्‍याचा प्रयत्‍न केला. यामुळे फ्लाईटमध्‍ये चांगलाच गोंधळ उडाला. फ्लाईटच्‍या स्‍टाफने युवकाला कसेबसे खाली उतरवले. त्‍यानंतर त्‍याला पोलिसांकडे सोपवण्‍यात आले. प्राथमिक तपासातून समोर आले आहे की, आपला मोबाईल चार्ज करण्‍यासाठी युवक कॉकपिटमध्‍ये शिरण्‍याचा प्रयत्‍न करत होता.

 

मुंबई एअरपोर्टवरून कोलकात्‍याला जाणा-या 6E-395 या इंडिगोच्‍या फ्लाईटमध्‍ये सोमवारी संध्‍याकाळी 5.55 वाजता ही घटना घडली. फ्लाईट टेक ऑफ करणार तेवढ्यात एक प्रवासी कॉकपिटमध्‍ये शिरण्‍याचा प्रयत्‍न करू लागला. केबिन क्रूने त्‍याला समजावून सांगण्‍याचा प्रयत्‍न केला. मात्र त्‍याने आपला हट्ट सोडला नाही. अखेर सुरक्षाच्‍या कारणास्‍तव त्‍याला खाली उतरवण्‍यात आले. या सर्व प्रकारामुळे विमानातील प्रवासी चांगलेच गोंधळले होते. मात्र, युवकावर अद्याप कोणताही गुन्‍हा दाखल करण्‍यात आलेला नाही. 

बातम्या आणखी आहेत...