Home | Khabrein Jara Hat Ke | Man Turned Old Cave Into Luxurious House, Now Became Center of Attraction

लोक समजत होते जुनी गुहा; निघाले मात्र आलीशान घर... अनेक वर्षांपूर्वी एका व्यक्तीने गुहेचे केले होते घरात रुपांतर

दिव्यमराठी वेब टीम | Update - Nov 09, 2018, 11:44 AM IST

या गुहेत रात्र घालवण्यासाठी लोक मोजायला तयार आहेत मागेल ती किंमत.

 • Man Turned Old Cave Into Luxurious House, Now Became Center of Attraction

  लंडन- 2015 मध्ये इंग्लंडमधील वॉरसेस्टरशायरमध्ये अॅन्जेलो मास्ट्रोपिएट्रो नावाच्या व्यक्तिचे नाव चर्चेचा विषय बनला आहे. या व्यक्तीने स्वत:च्या कतृत्वावर 700 वर्षांपूर्वीच्या गुहेचे शानदार घरामध्ये रुपांतर केले. आज ही जागा इतकी प्रसिद्ध झाली असून लोक येथे रात्र घालवण्यासाठी मागेल तेवढी किंमत देण्यासाठी तयार आहे. या जागेचे नाव 'द रॉक हाउस रिट्रीट' असे असून, या गुहेच्या आतमध्ये अनेक सुविधा देण्यात आल्या आहे. अॅन्जेलो यांनी या गुहेला शानदार घराचे रुप देण्यासाठी जवळपास 1 कोटी 56 लाख रुपये खर्च केला आहे.

  या गुहेचा शोध लागला तेव्हा ही पडीत जागा होती. 2015 मध्ये अॅन्जेलो यांनी या जागेला एका शानदार घराचे रुप दिले. या घराच्या आतमध्ये शानदार बेडरूम, सुविधायुक्त किचन, म्युझिक सिस्टिम, वाय-फाय, डायनिंग टेबल, कॉफी मशीन उपल्बध आहे. या गुहेचे क्षेत्रफळ जवळपास 700 स्क्वेअर फूट आहे.

  या गुहेजवळ आहे सफारी पार्क

  > अॅन्जेलोच्या या घरामध्ये शॉवरसोबत ड्रेसिंग रूमसुद्धा आहे. या घराच्या काही अंतरावर रेन फॉरेस्ट आहे. अॅन्जेलो सांगतात की, ज्या लोकांना निसर्ग जवळून पाहायचा आहे, त्यांच्यासाठी ही एक उत्तम जागा आहे. इथून 40 किलोमीटर दूर अंतरावर वॉकिंग ट्रॅल्स आणि मिडलँड सफारी पार्क आहे.

  महिन्याला होत आहे लाखोंची कमाई

  > या घराच्या माध्यमातून अॅन्जेलो यांना महिन्याला लाखोंची कमाई होत आहे. मॉर्डन मेटमध्ये छापून आलेल्या एका इंटरव्हिव्युनूसार ही जागा आता वेबसाईटच्या माध्यमातूनसुद्धा बुक केली जाऊ शकते. अॅन्जेलो यांच्यामतानूसार, कपल्ससाठी ही जागा चांगला पर्याय आहे.

  पुढच्या स्लाइडवर बघा फोटोज

 • Man Turned Old Cave Into Luxurious House, Now Became Center of Attraction
 • Man Turned Old Cave Into Luxurious House, Now Became Center of Attraction
 • Man Turned Old Cave Into Luxurious House, Now Became Center of Attraction
 • Man Turned Old Cave Into Luxurious House, Now Became Center of Attraction

Trending