आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हातात साप घेऊन तरुणीच्या खोलीत घुसला, भीती दाखवून केला बलात्कार; मग घडले असे काही...

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीजिंग - चीनच्या एका हॉटेलात घडलेल्या घटनेमुळे सगळेच हैराण झाले. जिआंगशी शहरातील एका हॉटेलमध्ये एक मृतदेह आणि तीन-तीन साप सापडले आहेत. कर्मचाऱ्यांनी हे दृश्य पाहताच मॅनेजरला सांगितले आणि हॉटेलात पोलिसांना बोलावण्यात आले. बचाव पथकांना एक साप हॉटेलच्या एका रुममध्ये आणि दुसऱ्या रिकाम्या रुममध्ये दुसरा सापडला. रिकाम्या खोलीत सापडलेल्या त्याच खोलीत मृतदेह होता. काही मिनिटांपूर्वीच एक तरुणी त्या रुममध्ये राहत होती. तिनेच संपूर्ण घटनेचा खुलासा केला.


काय म्हणाली महिला..?
- तरुणीने सांगितल्याप्रमाणे, काही तासांपूर्वी एका व्यक्तीने तिला या हॉटेलच्या रुमममध्ये कामानिमित्त बोलावले होते. तिला खोलीत बसवल्याच्या अवघ्या काही मिनिटांत तो 3 साप हातात घेऊन घुसला. रुम लॉक करून सापाची भीती दाखवली आणि तिच्यावर बलात्कार केला. घटनास्थळी दाखल झालेल्या फायर फायटरने सांगितल्याप्रमाणे, हॉटेलमधून पकडलेले साप जगातील सर्वात विषारी सापांपैकी एक बँडिड क्रेट होते. सापांची भीती दाखवून अत्याचार करत असताना त्या व्यक्तीला सापांनी चावले होते. तरीही उपचार न घेता तो रात्रभर तेथेच थांबला. कथित बलात्कार करून तो सकाळपर्यंत तसाच आराम करत होता. 
- तरुणी सकाळी उठली तेव्हा तो त्याच बेडवर झोपलेला होता. तरुणी स्वतःला सावरून कशी-बशी घरी परतली आणि कुटुंबियांना आपल्यावर झालेल्या अत्याचाराची हकीगत मांडली. त्या सर्वांनी मिळून पोलिस स्टेशन गाठले आणि बलात्काराची तक्रार दाखल केली. परंतु, त्या तरुणीच्या संपूर्ण जबाबावर पोलिसांना अद्याप विश्वास बसलेला नाही. तिच्यावर खरोखर बलात्कार झाला होता का? किंवा त्या रात्री नेमके काय घडले याचा सविस्तर तपास सध्या सुरू आहे. 

बातम्या आणखी आहेत...