आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुमारिका मातेचा राक्षसी मुलगा, 13 वर्षे वयातच केले खतरनाक कारनामे, मग स्वत:ला घोषित केले ईश्वराचा अवतार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सॅन फ्रान्सिस्को - चार्ल्स मॅन्सन एक असा भयंकर गुन्हेगार होता, जो स्वत:ला ईश्वराचा अवतार असल्याचे सांगत होता. असे म्हणतात की, त्याच्यात हजारो लोकांना एकाच वेळी संमोहित करण्याची शक्ती होती. त्याच्या सांगण्यावर लोक कुणाचीही हत्या करायचे. पण हद्द म्हणजे, लोक म्हणायचे त्याच्यात दैवीय शक्ती आहेत. त्याच्या परवानगीशिवाय लोक संबंधही बनवत नव्हते. 

 

कुमारिका मातेचा मुलगा...
- असे सांगतात की, चार्ल्स मॅन्सन एका कुमारिका मातेचा मुलगा होता. 16 वर्षे वयात त्याच्या आईने त्याला जन्म दिला होता आणि मग तो तिच्यापासून दूर गेला. त्याने तेरा वर्षे वयापासून गुन्हेगारी जगतात प्रवेश केला. चार्ल्सने अनेक खळबळजनक हत्या केल्या. 1971 मध्ये त्याला मृत्युदंडाची शिक्षा ठोठावण्यात आली, परंतु मृत्युदंडावर बंदी आल्याने त्याची शिक्षा जन्मठेपेत रूपांतरित झाली.


तेरा वर्षे वयात मेन्सनने एका ग्रोसरी स्टोअर आणि एका कॅसिनोमध्ये दरोडा टाकून गुन्हेगारीला सुरुवात केली. पुढची 10 वर्षे मेन्सन वेगवेगळ्या गुन्ह्यांत सक्रिय होता. कधी तुरुंगात, तर कधी तुरुंगाबाहेर राहत होता. 16 वर्षे वयातच त्याला तडीपार करण्यात आले.

 

अलौकिक शक्तीचा करू लागला दावा
1958 मध्ये पॅरोलवर सुटल्यानंतर मेन्सनने वेश्यांची दलाली सुरू केली. जून 1960 मध्ये मेन्सनला अटक करण्यात आली, परंतु तो लवकरच सुटला. सुटल्यानंतर त्याने आर्थिक गुन्हे सुरू केले. एका सरकारी चेकमध्ये फसवणूक केल्याप्रकरणी त्याला 10 वर्षांची कैद झाली.


तुरुंगात राहत असतानाच त्याने स्वत:बाबत भ्रम पसरवला की, त्याच्यात अलौकिक शक्ती आहेत. 21 मार्च 1967 रोजी जेव्हा मेन्सनच्या सुटकेचा दिवस आला तेव्हा त्याने जेल अधिकाऱ्यांना विनंती केली की, त्याला त्याच तुरुंगात राहू देण्यात यावे, परंतु ते शक्य झाले नाही.


तो अशी चलाखी करायचा की, लोक वेडे व्हायचे. पुरुष, महिला एवढेच काय टीनएजर्ससुद्धा त्याला येऊन भेटू लागले. लोकांवर त्याचे एवढे संमोहन झाले होते की, त्याने एक इशारा करताच ते कुणाचीही हत्या करायला तयार व्हायचे.


बनवला स्वत:चा वेगळा धर्म
1967 मध्ये त्याने मेन्सन फॅमिली बनवून सांप्रदायिक विष कालवायला सुरुवात केली. तो त्याला धर्म म्हणू लागला. एक वेगळाच धर्म जो सर्वांपासून वेगळा होता. लॉस एंजलिसमध्ये त्याने एक पॉप म्यूजिशियन बनण्याचा प्रयत्न केला. श्वेतवर्णीय व कृष्णवर्णीय यांना एकमेकांविरुद्ध भडकवण्याचे काम त्याने केले.

 

त्याच्या परवानगीशिवाय संबंधही बनवत नव्हते भक्त
हळूहळू चार्ल्स मेन्सनच्या पंथात शेकडोंच्या संख्येने लोक सामील झाले. असे सांगतात की, तो सॅन फ्रांसिस्कोच्या एका वस्तीवर कब्जा करून राहू लागला होता. त्याने तेथे फ्री लव्ह सारखी प्रथा बनवली. यानुसार, येथे राहणारी कोणतीही व्यक्ती कुणावरही प्रेम करू शकत होती. परंतु संबंध बनवण्याआधी त्याला चार्ल्स मेन्सनची परवानगी घ्यावी लागत होती. दुसरीकडे चार्ल्स स्वत:ला ईश्वराचा प्रतिनिधी असल्याचे सांगून महिलांशी संबंध ठेवायचा. त्याच्या पंथात प्रत्येक महिला स्वत:हून त्याला समर्पित व्हायची.

 

मग घडवली श्वेत-अश्वेतांमध्ये हिंसा
त्याने एकदा विचित्र भविष्यवाणी केली आणि अशी अफवा पसरवली की, श्वेतवर्णीय लवकरच अश्वेतांविरुद्ध बंडखोरी करतील. यात अनेक लोक मारले जातील. ऑगस्ट 1969 मध्ये या अफवेला आणखी हवा देण्यासाठी त्याने प्लानिंग करून आपल्या लोकांकडून अनेक अश्वेतांच्या हत्या घडवल्या.

 

असे पकडले पोलिसांनी
- आपल्या काळ्या कृत्यांमुळे मेन्सन जास्त दिवस लपून राहू शकला नाही. 1970 मध्ये त्याच्यावर एका प्रसिद्ध अमरेकी अॅक्ट्रेसच्या हत्येचा आरोप लागला. यानंतर 29 मार्च रोजी मृत्यूची शिक्षा सुनावण्यात आली. परंतु नंतर त्याला जन्मठेप झाली. तथापि, मेन्सन येथेही थांबला नाही आणि त्याने तुरुंगात राहूनही आपल्या इशाऱ्यावरून अनेक गुन्हे घडवले.

 

1 वर्षात 60 हजार पत्रे
- एवढी नृशंस कृत्ये करूनही मेन्सनला मानणाऱ्यांची संख्या वरचे वर वाढतच चालली होती. जसे काही त्याने जादूटोणा केलेला असावा. त्याने तुरुंगात राहूनही अनेक हत्या घडवल्या. तो फक्त सांगायचा आणि बाहेर हत्या व्हायची. तुरुंगात असूनही त्याला एका दिवसात शेकडो पत्रे यायची, यावरून त्याच्या लोकप्रियतेची कल्पना येईल. यात बहुतांश पत्रे ही अशा तरुणांची असायची, ज्यांना त्याच्या पंथात सामील होण्याची इच्छा आहे. असे म्हणतात की, त्याला एका वर्षात 60,000 हून अधिक पत्रे यायची. 19 नोव्हेंबर 2017 रोजी चार्ल्सचा तुरुंगातच मृत्यू झाला.

 

पुढच्या स्लाइडवर पाहा, क्रूरकर्मा चार्ल्स मॅन्सनचे आणखी Photos...  

 

बातम्या आणखी आहेत...