आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Man Who Slept Next To His Dead Wife's Body For Six Days, Told Shocking Reason Behind It

6 दिवस बायकोच्या डेड बॉडीसोबत झोपला व्यक्ती, सांगितले यामागचे विचित्र कारण

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन. एखाद्याच्या निधनानंतर त्याच्या पार्थिवावर लवकरात लवकर अंत्यसंस्कार केले जातात. परंतू लंडनमध्ये राहणा-या रसेल डेविसनने जे केले त्यामुळे सर्वच हैराण झाले. रसेलने बायकोच्या निधनानंतर तिच्यावर अंत्यसंस्कार केले नाही, तर 6 दिवस तो तिच्यासोबत राहिला. त्याने कायदेशीररित्या बायकोच्या डेड बॉडीला अंघोळ घालून बेडरुममध्ये ठेवले आणि तिच्यासोबत झोपला. 


हे आहे पुर्ण प्रकरण 
- बायको वेंडी डेविसन (Wendy Davison)च्या निधनानंतर रसेलने तिचे पार्थिवर आपल्यासोबत ठेवले आणि त्याची काळजी घेतली. रसेलचे असे वागणे पाहून सर्वच हैराण होते. परंतु पत्नीसाठीचे त्याचे प्रेम पाहून सर्वच त्याच्यासमोर झुकले. 


नातेवाईकांनी खुप समजावले पण त्याने ऐकले नाही 
- रसेलची बायको गेल्या 10 वर्षांपासून सर्वाइकल कँसरचा सामना करत होती. पत्नीच्या निधनानंतर रसेल डेविसन खुप दुःखी होते. नातेवाईक आणि इतर लोकांनी समजावल्यानंतर त्याने पत्नीचे पार्थिव दफन करण्यास नकार दिला. त्याने 6 दिवस पुर्ण वेळ त्या पार्थिवासोबत घालवला. ते म्हणाले की, ते पार्थिवसोबत बोलायचे.


नंतर सांगितले यामागचे कारण
- या घटनेविषयी डेविसनने सांगितले की, त्यांच्या पत्नीला अखेरचे श्वास त्यांच्या घरात घ्यायचे होते. डेविसनने सांगितले की, पत्नीचे पार्थिव दफन करण्याऐवजी बेडरुममध्ये ठेवण्यामागे त्यांचा वेगळा हेतू होता. लोक निधनानंतर पार्थिवासोबत वेगळे वागतात, मला त्यांना आव्हान द्यायचे होते.
- रसेल डेविसन म्हणाले की, यावेळी त्यांना पत्नीच्या जवळ राहून खुप समाधान मिळाले. ते म्हणाले की, मृत्यू आपल्या समाजात एक असा विषय आहे, ज्यावर लोक विचित्र व्यवहार करतात. मेल्यानंतर अचानक त्या व्यक्तीसोबत वाईट वागतात, जसे तो काहीच नव्हता. अनेक धर्मांमध्ये पार्थिवाला अंथरुणावरुन काढून जमीनीवर ठेवले जाते. अनेक लोक याला अपवित्र म्हणतात.


विचार बदलावे लागतील 

- डेविसनने आपल्या फेसबुक पोस्टवर लोकांना उत्तर देत म्हटले की, ज्या प्रकारे तुम्ही माझ्या वागण्यावर चिडत आहात, त्यावरुन अंदाज लावला जाऊ शकतो की, तुम्ही मेलेल्या व्यक्तीविषयी काय विचार करत असाल. आपल्याला विचार बदलावे लागतील. आपण विचार करायला हवा की, आपण ज्यावर एवढे प्रेम करतो, त्याच्या शरीरातून प्राण निघून गेल्यावर त्याच्यासोबत परक्यासारखे का वागातो.

 

 

बातम्या आणखी आहेत...