आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Man With Two Wives, Jump From 8th Floor Of Bulding In Indirapuram Area Gaziyabad

आर्थिक अडचणीमुळे व्यावसायिकाची 2 पत्नींसह 8 व्या मजल्यावरून उडी मारुन आत्महत्या, फ्लॅटमध्ये 2 मुलांचेही मृतदेह आढळले

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • घरातील भितींवर 500 च्या नोटा आणि बाउंस चेक चिटकवले
  • सुसाइड नोटमध्ये लिहीले- आम्हा सर्वांचा अंतिम संस्कार सोबत करावा

गाझियाबाद- दिल्लीजवळील इंदिरापुरम परिसरात मंगळवारी एका व्यावसायिकाने आपल्या दोन पत्नींसह 8 व्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या केली. त्याच फ्लॅटमध्ये त्यांच्या दोन मुलांचेही मृतदेह आढळले. रुममध्ये सापडलेल्या सुसाइड नोटमध्ये आर्थिक अडचणीमुळे आत्महत्या करत असल्याचा उल्लेख केला आङे. तसेच, घरातील भितींवर 500 च्या नोटा आणि बाउंस चेक चिटकवला आणि लिहीले की, या पैशांचा उपयोग आमच्या अंतिम संस्कारासाठी करावा.गाझियाबाद पोलिसांनी सांगितल्यानुसार, घटना इंदिरापुरमच्या वैभव खंड मधील कृष्णा सफायर सोसायटीमध्ये झाली आहे. मृत गुलशन यांची जीन्सची फॅक्टरी होती. त्यांच्या दोन पत्नी परवीन आण संजना तसेच, ऋतिक(11) आणि मुलगी ऋितीका (12) याच्यासोबत राहत होते. आर्थिक अडचणीमुळे त्यांनी आधी आपल्या दोन मुलांचा जीव घेतला आणि त्यानंर दोन्ही पत्नींसोबत मिळून आत्महत्या केली. घरात पाळीव ससाही मृत अवस्थेत आढळला.

बातम्या आणखी आहेत...