आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'मन फकिरा'च्या निमित्ताने मृण्मयी म्हणाली - अभिनयापेक्षा दिग्दर्शन करणे खूपच आव्हानात्मक

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्कः 'मन फकीरा' चित्रपट 6 मार्च रोजी प्रदर्शित होत अाहे. या चित्रपटाच्या माध्यमातून मराठी चित्रपटसृष्टीतील नावाजलेली अभिनेत्री मृण्मयी देशपांडे दिग्दर्शन क्षेत्रात पाऊल ठेवत आहे. या चित्रपटात सुव्रत जोशी, सायली संजीव, अंजली पाटील आणि अंकित मोहन यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटाच्या निमित्ताने दिग्दर्शिका मृण्मयी देशपांडेसाेबत झालेली बातचीत.

मृण्मयी पुढे म्हणाली, दिग्दर्शनासाठी एक ठरावीक प्रगल्भता लागते. एकेक प्रसंग हाताळताना त्यातून ही प्रगल्भता येते आणि त्यातून तुम्ही दिग्दर्शनासाठी सज्ज होता. 'मन फकीरा' या चित्रपटाची कथा मला प्रवास करत असताना सहज अगदी ट्रॅफिकमध्ये सुचली. अभिनयापेक्षा दिग्दर्शन करणे खूपच आव्हानात्मक आहे. कारण अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. त्यातून मार्ग काढावा लागतो. पण मला कठीण गोष्टी करायला आवडतात, त्यामुळे दिग्दर्शन करायला मला आवडते.