आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खूप पैसा असेल तरच मोठा बदल घडतो? गरजेचे नाही!

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोमवारी मला भारतीय-अमेरिकी दांपत्य-कार्डिओलॉजिस्ट किरण सी. पटेल आणि त्यांची बालरोगतज्ञ पत्नी पल्लवी पटेल यांच्याबाबत समजले. या दांपत्याने फ्लोरिडात एका स्टेट ऑफ द आर्ट हेल्थ केअर युुनिटच्या स्थापनेसाठी २३ कोटी डॉलर दान म्हणून दिले. भारत आणि आफ्रिकेतील गरीब रुग्णांना मदत मिळावी हा हेतू. कोणत्याही भारतवंशीय-अमेरिकी दांपत्याद्वारे दिलेले हे आजवरचे सर्वात मोठे दान. निश्चितपणे आपण सारेच उदार मनाचे आहोत. मात्र खिसा भरलेला नसेल तोवर आपण अशा उदारतेबाबत विचारही करू शकत नाही. मला एक जोडपे आठवले, जे आपल्या भूमीकडे पुन्हा परतले होते. कारण आयुष्य जरासे संथ व्हावे हा हेतू. त्यांचा हा प्रवास एका ग्रामीण शाळेच्या स्थापनेनंतर थांबला. आज तेथे १ हजारांहून जास्त गरीब मुले शिक्षण घेत आहेत. कॅप्टन शक्ती लुम्बा आणि त्यांच्या पत्नी इला लुम्बा यांनी शहरी जीवनातील प्रदूषण, कीटकनाशके आणि हानिकारक वस्तूंपासून दूर जात आयुष्य व्यतीत करण्याचा निर्णय घेतला. इला यांच्या आईला झालेला अल्झायमर्स आजार हे अनेक कारणांपैकी एक कारण. इला यांनी अल्झायमर्सबाबत खूप संशोधन केले. आपल्या मेंदूला नुकसान पोहोचवणाऱ्या सर्व गोष्टी दूर करायला हव्यात असे त्यांना आढळले. या दांपत्याला पाण्याच्या स्रोताजवळ एक जमीन आढळली. दिल्लीपासून काही अंतरावर एनसीआर क्षेत्रात अरावली पठाराने घेरलेली ही जमीन पडीक होती. ती खरेदी करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. शेतीची पार्श्वभूमी आणि स्टार्टअप्समध्ये नैपुण्य असणे ही त्यांच्यासाठी जमेची बाजू. शक्ती आठवड्यातून दोनदा शेतात जाऊ लागले. तेथे अनेक प्रकारची झाडे लावली. लवकरच पूर्ण जमीन हिरवीगार झाली. इला आपल्या आईलाही कारमधून सोबत घेऊन जात. दिवसभर शेतात थांबून सायंकाळी घरी परतत. शेती आकार घेऊ लागली. यादरम्यान त्यांची नजर जवळपासच्या ग्रामीण मुलांवर पडली. हातात अवजारे घेऊन ती शेतात कामासाठी येत. या मुलांना पाहून त्यांच्या मनात लर्निंग सेंटर स्थापण्याच्या विचाराचा जन्म झाला. फक्त चार मुलांसह हे केंद्र सुरू झाले. आज एक दशकानंतर सहा गावांतील १ हजारांहून जास्त मुले येथे शिक्षणासाठी येतात. या शाळेत कोणत्याही मुलाला शिक्षणासाठी नकार ऐकायला मिळणार नाही, हे त्यांचे मार्गदर्शक तत्त्व. मात्र हे काम मुळीच सोपे नव्हते. सुरुवातीला पालक मुलांना शाळेत पाठवायला कचरत. एका समुदायाने आरोप केला की, बिस्किटाचे आमिष दाखवून मुलांना शाळेपासून ते दूर करत आहेत. प्रचंड दबावातही इला म्हणायच्या की, माझी कोणाशीही स्पर्धा नाही. मला योग्य वाटते ते करण्यासाठी मी येथे आले. काळ बदलत गेला. मांगेर गावच्या महिलांनीही आत्मनिर्भर बनावे असे या दांपत्याला वाटू लागले. मनासारखे काम करण्याचा त्यांच्यात आत्मविश्वास यावा अशी त्यांची इच्छा. आज या दांपत्याच्या योगदानामुळे काही महिलांनी प्रशिक्षण घेतले आहे. त्यांना आता मोलकरणीचे काम करण्याची गरज नाही. आज त्यांच्या ९ एकरच्या संपत्तीने पूर्ण परिसरात सकारात्मकतेचे बीज रोवले आहे. त्यांच्याशी जोडलेल्या लोकांच्या जीवनातही मोठा बदल घडवून आणण्याचे काम केले आहे.

फंडा असा - तुमच्या जवळपास बदल घडवून आणण्यासाठी फार श्रीमंत असण्याची गरज नाही. थोडेसे पैसे आणि खूप साऱ्या महत्त्वाकांक्षेच्या बळावर बदल घडवता येतो.


एन. रघुरामन
मॅनेजमेंट गुरू
raghu@dbcor
p.in

बातम्या आणखी आहेत...