आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संकट आल्यानंतर स्वत:ची जबाबदारी स्वत:च उचला

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भीतीने मुंबईला विळखा घातला आहे. दहा पाकिस्तानी दहशतवाद्यांनी मुंबईवर हल्ला केला. अनेक निर्दोष लोकांना मारले. तेव्हाही भीती झुगारून मुंबईकर बाहेर पडले. मात्र आताच्या कोरोनाची दहशत वेगळी आहे. भारतात गुरुवारी कर्नाटकात पहिला बळी गेला. मुंबईतही गेल्या तीन दिवसांपासून रोज रुग्ण सापडत आहेत. लोकांची कपडे घालण्याची पद्धत बदलली आहे. हातमोजे आणि मास्क घालून फिरताना लोक दिसतात. त्यामुळे फॅशन जरा मागे पडली आहे. एक प्रकारची दहशत पसरली आहे. भीतीमुळे मुंबई आणि पुणेकर काही प्रायोगिक उपाय अवलंबत आहेत. कोरोनापासून वाचणे हाच त्यामागचा एकमेव हेतू. गुरुवार, शुक्रवारी रस्त्यावर रिक्षा, टॅक्सी कमी धावताना दिसल्या. रेल्वेस्थानकांवरही स्वच्छता होत असलेली दिसली. अनेक सार्वजनिक कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. ‘सूर्यवंशी’ चित्रपटही रिलीज झाला नाही. सिनेपुरस्कारही थांबले. म्हणजेच मुंबईने पॅनिक बटण दाबले आहे. काळाची मागणी अशी की, खबरदारी घ्या. दुसऱ्या लोकांना संकटात टाकू नका. महापालिकेने एक चांगला निर्णय घेतला आहे. शुक्रवारी ७०० खाटांचे एक रुग्णालय एका वर्षानंतर पुन्हा सुरू करण्यात आले. प्रॉपर्टी टॅक्स न भरल्यामुळे ते बंद होते. तेरा महिन्यांपासून बंद सेव्हन हिल्स रुग्णालयाला मुंबईकरांच्या सेवेत दाखल करण्यात आले ही चांगली गोष्ट. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ही सूचना दिली. त्यामुळे अनेक लोकांना मोठा दिलासा मिळाला आहे. एक टीम बनवण्यात आली असून बंद रुग्णालय ती लवकरच सुरू करणार आहे. वीज, पाणी, औषधांसारख्या गरजेच्या गोष्टींचा पुरवठा करण्यासाठी टीममध्ये विशिष्ट लोक समाविष्ट करण्यात आले आहेत. मुंबईसारख्या मोठ्या शहरात रोज ३०० नमुन्यांचे परीक्षण करण्यासाठी केवळ एक केंद्र आहे. त्यामुळे १ हजार नमुन्यांचे परीक्षण करण्यासाठी प्रत्येक ठिकाणी अशी दोन केंद्रे निर्माण करण्याची शहराची योजना आहे. शुक्रवारी दुपारी शाळाही बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. काही सहकारी सोसायट्यांनी प्रवेशद्वारावर वॉशबेसिन ठेवणे सुरू केले आहे. हात धुण्यासाठी साबणही असेल. इमारतीत प्रवेश करण्याआधी सर्वांना आधी हात धुण्यास सांगितले जाते. मास्क लावलेल्या लोकांनाच प्रवेश दिला जातो. इतर लोकांना सांगितले जाते की, सामान चौकीदाराकडेच ठेवावे. ज्याचे आहे त्याला दिले जाईल. प्रवास करणाऱ्या लोकांची वेगळी यादी बनवली जात आहे. त्यांना तपासणी करण्यास सांगण्यात येत आहे. पुण्यात कोणत्याही परिसरात प्रवेश करण्यापूर्वी मास्क घालणे आणि हात धुणे अनिवार्य करण्यात आले आहे. आरोग्य अधिकारी आणि हेल्पलाइन नंबर नोटीस बोर्डावर लावण्यात आले आहेत. व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून सोसायटीतील लोकांना काय करावे, काय नाही हेही सांगितले जात आहे. सोसायटीतील लोकांना वेगळे ठेवावे लागण्याची वा रुग्णालयात वेगळ्या कक्षात ठेवण्याची वेळच येऊ नये यासाठी सगळेच जण काळजी घेत आहेत.

फंडा असा : मुंबईप्रमाणे पॅनिक बटण दाबण्याची वेळ येऊ देऊ नका. एखादे संकट येते तेव्हा प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक समूहाला जबाबदारी स्वीकारावी लागते. मग दुसरे काय म्हणतील याचा विचारच करू नका.

बातम्या आणखी आहेत...