आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Manav Have To Leave The Home Due To Table Tennis At The Age Of 12, Archana Choose The Game Because It Is The Sport Which Is Second Fastest In The World

मानवला टेबल टेनिससाठी वयाच्या 12 व्या वर्षी सोडावे लागले घर, हा खेळ जगात दुसरा सर्वात वेगवान असल्याने अर्चनाने केली निवड

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • भारताचा मानव 21 वर्षांखालील मुलांमध्ये जगातील नंबर वन व अर्चना मुलींमध्ये दुसऱ्या स्थानावर
  • दोघे खेळाडू पोर्तुगालमधील जागतिक टीम ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेत सहभागी

​​​​​​नवी दिल्ली : नुकतेच आंतरराष्ट्रीय टेबल टेनिस फेडरेशनने जागतिक क्रमवारी जाहीर केली. यात भारताचा मानव ठक्कर २१ वर्षांखालील जगातील नंबर वन खेळाडू बनला. तो १८ वर्षांखालील गटातदेखील अव्वलस्थानी पोहोचला होता. मुलींच्या २१ वर्षांखालील गटात भारताची अर्चना कामत जगातील नंबर २ खेळाडू बनली. १९ वर्षीय मानव व २० वर्षीय अर्चना पोर्तुगालमध्ये जागतिक टीम ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेत खेळणाऱ्या भारतीय संघात सहभागी आहेत.

  • स्केटिंग व जिम्नॅस्टिकमध्ये पदक; आई-वडिलांकडून शिकवण

प्रश्न : १८ वर्षांखालील व आता २१ वर्षांखालील नंबर वन बनलास. त्यामुळे दबाव वाढला आहे का?

मानव : मी दोन्ही क्रमवारीत नंबर वन बनणारा पहिला भारतीय आहे. मी हे संघर्ष करून मिळवले आहे, दबाव घेत नाही. मी नेहमी सकारात्मक विचार करतो, आपल्या खेळावर लक्ष देतो. हे मला पुढे जाण्यासाठी प्रेरित करते.

प्रश्न : तू टेबल टेनिसची सुरुवात कशी केली? हाच खेळ का निवडला?

मानव : मी लहानपणी स्केटिंग करत होतो. मी जिल्हास्तरीय स्केटिंग स्पर्धेत पदके जिंकली आहेत. त्यानंतर जिम्नॅस्टिकमध्ये जिल्हा व राज्य स्तरावर पदके मिळवली. राहिला टेबल टेनिसचा प्रश्न, ते तर माझ्या रक्तात आहे. माझे पालक डॉक्टर आहेत. त्यांनी महाविद्यालयीन स्तरावर टेबल टेनिसमध्ये पदके जिंकली. अशात मला हा खेळ त्यांच्याकडूनच मिळाला. घरी टेबल टेनिसचा टेबल आहे. ते मोकळ्या वेळेत खेळतात. मी ६ वर्षांचा असताना खेळण्यास सुरुवात केली. कधी-कधी त्यांच्यासोबत खेळत होतो. काही दिवसांत मी या खेळात रमलो, इतर खेळ सोडून दिले. मात्र, यात मला घवघवीत यश मिळाले.

प्रश्न : २०१७ मध्ये अल्टिमेट टेबल टेनिस लीग सुरू, काय बदल झाला?

मानव : अल्टिमेट टेबल टेनिस लीगमुळे माझा खेळात सुधारणा करण्यास मदत झाली. त्यामुळे मला अव्वल खेळाडूंसोबत खेळण्यास संधी मिळाली. अनेक ऑलिम्पियन खेळाडूंकडून शिकण्यास मिळाले. त्यांच्या बारीक गोष्टी आत्मसात करता आल्या, ज्यात ते सामन्यापूर्वी कशी तयारी करतात, काय खातात, स्वत:ला मानसिक व शारीरिक कसे तंदुरुस्त ठेवतात हे कळले.

प्रश्न : टेबल टेनिसमध्ये कोणत्या आव्हानाचा सामना करावा लागला?

मला टेबल टेनिससाठी वयाच्या १२ व्या वर्षी घर सोडावे लागले. अशात पालकांसाठीदेखील ते अवघड होते. मी राजकोट (गुजरात) मधील आहे. खेळाची आवड पाहून पालकांनी मला अजमेर येथील पीएसपीबी अकादमीत प्रवेश मिळवून दिला. मी येथेच वसतिगृहात राहत होतो. मला सर्व स्वत:लाच नियोजन करावे लागत होते. कधी-कधी मला एकट्याला प्रवास करावा लागत होता. अभ्यास व सरावाचे नियोजन करावे लागले. मार्गदर्शन करणारे कोणी नव्हते. आई-वडिलांच्या आठवणीत खूप रडत होतो.

  • अर्चना काकांच्या घरी शिकली, मणिका बत्राला हरवले

प्रश्न : तू यूथ ऑलिम्पिकमध्ये उपांत्य फेरीत पोहोचणारी पहिली भारतीय खेळाडू आहेस, अाता तुझ्यावर दबाव वाढला असेल?

यूथ ऑलिम्पिकच्या उपांत्य फेरीत पोहोचताना माझे स्वप्न पूर्ण होण्यासारखे आहे. त्यामुळे मला पुढे जाण्यासाठी प्रेरणा मिळाली. अशा प्रदर्शनामुळे भविष्यासाठी प्रोत्साहन मिळते. पुढे जाण्यास ऊर्जा मिळते.

प्रश्न : तू टेबल टेनिसची सुरुवात कशी केली? हाच खेळ का निवडला?

अर्चना : खेळाचा व माझ्या पालकांचा दूरदूरपर्यंत संबंध नव्हता. माझे वडील डोळ्याचे डॉक्टर आहेत. एकदा मी सुटीत भावासोबत काकांच्या घरी मंगळूरला गेले होते. तेव्हा काकांनी टेबल टेनिसबाबत सांगितले. त्यांच्या घरी टेटे टेबल होता. त्यांनी आम्हाला खेळण्यास शिकवले. खरे तर सुरुवातीला माझ्यापेक्षा भावाला हा खेळ अधिक आवडत होता. निवांत असेल तेव्हा तो मला खेळण्यासाठी बोलावत होता. हा खेळ जगातील दुसरा सर्वात वेगवान खेळ असल्याने मला खूप आवडतो.

प्रश्न : अल्टिमेट टेबल टेनिसमुळे तुझ्या खेळात काय बदल झाला? तू वरिष्ठ गट राष्ट्रीय स्पर्धेत कॉमनवेल्थ विजेत्या मणिका बत्राला हरवले, काय रणनीती बनवली होती?

अर्चना : अल्टिमेट टेबल टेनिसने मला एक व्यासपीठ मिळवून दिले, जेथे जगातील अव्वल मानांकित खेळाडूंसोबत खेळण्याची संधी मिळाली. मणिका माझी प्रेरणास्रोत आहे. तिच्याशी वरिष्ठ राष्ट्रीय स्पर्धेत व लीगमध्ये खेळण्याची संधी मिळाली. त्यात जिंकण्यात यशस्वी ठरले. तिच्यासाठी कोणतीही विशेष रणनीती बनवली नव्हती. केवळ आपल्या नैसर्गिक खेळावर लक्ष दिले.

प्रश्न : टेबल टेनिसमध्ये कोणत्या आव्हानाचा सामना करावा लागला?

अर्चना : मला सर्वाधिक संघर्ष यूथ ऑलिम्पिकच्या पात्रतादरम्यान करावा लागला. मी पात्रतेमध्ये चांगली कामगिरी करू शकले नाही. मी अखेरच्या क्षणी पात्रता मिळवली. मी खूप निराश झाले होते, फेडरेशन व प्रशिक्षकांनी मला साथ दिली, माझ्यावर विश्वास कायम ठेवला.

प्रश्न : तू स्वत:ला मानसिक व शारीरिक तंदुरुस्तीसाठी काय करतेस?

अर्चना : आम्हाला प्रवास अधिक करावा लागतो. अशात नियोजनात त्यानुसार बदल करावा लागतो. मात्र इतर दिवशी ३ तास सकाळी व ३ तास सायंकाळी सराव करते. मधल्या वेळेत फिटनेस सत्र पूर्ण करते.