आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबॉलिवूड डेस्क : 'जॉली एलएलबी 2', 'तुम्हारी सुलू' आणि 'बदला' चित्रपटात काम केलेल्या मानव कौलने खुलासा केला आहे की, त्याने डिप्रेशनचा सामना केला आहे. त्याने एका इंटरव्यूमध्ये सांगितले, "प्रत्येकाच्या आयुष्यात एक लो पॉइंट यातच असतो. माझ्या आयुष्यातही आला होता. एक वेळ होती, जेव्हा मी खूप डिप्रेशनमध्ये होतो. 'काई पो छे' (2013) च्या रिलीजनंतर आमची एक सक्सेस पार्टी झाली आणि त्यावेळी माझ्याकडे घरी परत जाण्याचेही पैसे नव्हते. त्यामुळे मी पायीच निघालो होतो. हा माझ्या आयुष्यातील एक लो पॉइंट होता."
पुस्तकांच्या मदतीने डिप्रेशनमधून बाहेर आला मानव...
मानव पुढे म्हणाला, "त्यावेळी मी शौल बेल्लो (Saul Bellow) यांच्यसारख्या काही महान रायटर्सची पुस्तके वाचत होतो. त्यामुळे मला खूप मदत मिळाली. साहित्यात खूप ताकद आहे. जेव्हा तुम्ही एखाद्या स्टोरीमध्ये शिरकाव करता तेव्हा सर्वकाही विसरता आणि आणि स्वतःबद्दल कमीच विचार करतात. हे गरजेचेही आहे. मी स्वतःला प्ले डायरेक्ट करण्यात आणि अभिनयात व्यस्त ठेऊ लागलो, जे मला आवडायचे. हळू हळू मी डिप्रेशनमधून बाहेर आलो."
रायटर आणि स्टेज डायरेक्टरदेखील आहे मानव...
मानव अभिनेता असण्यासोबतच लेखक आणि स्टेज डिरेक्टरदेखील आहे. त्याने 'ठीक तुम्हारे पीछे', 'प्रेम कबूतर', 'तुम्हारे बारे में' और 'अ नाइट इ द हिल्स' ही पुस्तकेही लिहिली आहे. अशातच नवी दिल्लीच्या श्रीराम सेंटरमध्ये झालेल्या समर थिएटर फेस्टिवलदरम्यान मानवचे पुस्तक 'प्रेम कबूतर' नाटकाच्या रूपात सादर केले गेले. याचे खूप कौतुकही झाले. पण मानवने सांगितले की, त्याचे प्ले पाहात नाही. त्यामुळे तो 'प्रेम कबूतर' पासूनही दूर राहिला. पण लोकांकडून त्याचे कौतुकही ऐकले.
स्वतःला एक आळशी लेखक म्हणतो मानव...
आपल्या लेखनकलेविषयी मानव म्हणतो, "मी माझ्या सहज बुद्धिने लिहितो, मी रस्ता, नियम किंवा जागा हे फॉलो करत नाही, कारण हा कोणताही जॉब नाहीये. लिहिले आवडते आणि जेव्हा मनात काही येते तेव्हा लिहितो. मला केवळ एक चांगली कॉफी आणि बसण्यासाठी शांत जागा हवी असते. मी पहाटे चार वाजता, रात्री दोन वाजता आणि दुपारीही लिहू शकतो. जास्त विचार करू शकत नाही.... मला वाटते की, मी एक आळशी लेखक आहे."
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.