आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जनादेश, आशीर्वाद यात्रेत शिवसेना-भाजपचा पाेळा, आदित्य ठाकरे लढणार वरळीतून 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद : राज्यभरातील शेतकऱ्यांनी शुक्रवारी पाेळ्याचा सण उत्साहात साजरा केला. महाजनादेश यात्रेच्या निमित्ताने हिंगाेली दाैऱ्यावर असणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व जनआशीर्वाद यात्रेच्या निमित्ताने गंगापूरच्या (जि. औरंगाबाद) दाैऱ्यावर असलेले युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी स्थानिक शेतकऱ्यांसाेबत पोळा सण असा साजरा केला. 

आदित्य ठाकरे लढणार वरळीतून 
मुंबई : आदित्य ठाकरे वरळीतून विधानसभेची निवडणूक लढवतील. शिवसैनिकांनी आतापासूनच कामाला लागावे, असे आदेशवजा आवाहन शिवसेनेचे आ. अनिल परब यांनी शुक्रवारी गटप्रमुखांच्या मेळाव्यात केले. ठाकरे घराण्यात आजवर काेणीही निवडणुका लढवल्या नाहीत. या घराण्यातील तिसऱ्या पिढीचे प्रतिनिधित्व करणारे आदित्य पहिले उमेदवार ठरतील. 

बातम्या आणखी आहेत...