आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मंगळवारी 8 दिवे लागून वेगवेगळ्या दिशांना ठेवावेत आणि करावेत हे सोपे उपाय

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आज (4 डिसेंबर, मंगळवार) कार्तिक मासातील कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथी आहे. या दिवशी महादेवाला प्रसन्न करण्यासाठी प्रदोष व्रत केले जाते. यावेळी हे व्रत मंगळवारी आल्यामुळे याला मंगळ किंवा भौम प्रदोष असे म्हणतात. मंगळवारी या विधीनुसार करावी महादेवाची पूजा...


प्रदोष व्रत विधी
- पाणी न पिता प्रदोष व्रत करावे. सकाळी स्नान केल्यानंतर शंकर-पार्वती आणि नंदीला पंचामृत, गंगाजलाने अभिषेक करावा. त्यानंतर बेलाचे पान, गंध, फुल, अक्षता, अर्पण करून धूप-दीप लावून नावैद्य दाखवून पूजा करावी.


- संध्याकाळी पुन्हा स्नान करून अशाच प्रकारे महादेवाची पूजा करावी. महादेवाला शुद्ध तूप आणि साखर मिश्रित पदार्थाचा नैवेद्य दाखवावा.


- आठ दिशांना आठ दिवे लावावेत. प्रत्येक दिवा लावल्यानंतर महादेवाला नमस्कार करावा. शिव स्तोत्र, मंत्राचा जप करावा. रात्री जागरण करावे.


- अशा प्रकारे सर्व इच्छापूर्ती आणि कष्टातून मुक्ती मिळवण्यासाठी व्रत करणाऱ्या व्यक्तीने प्रदोष व्रताच्या धार्मिक विधानाचे नियम आणि संयमाने पालन करावे.


शिवपुराणानुसार, महादेवाला प्रसन्न करण्याचे उपाय खालीलप्रमाणे आहेत...
1- महादेवाला तांदूळ अर्पण केल्याने धन प्राप्त होते.
2- तीळ अर्पण केल्याने पापांचा नाश होतो.
3- जवस अर्पण केल्याने सुखामध्ये वृद्धी होते.
4- गहू अर्पण केल्याने आपत्य वृद्धी होते.
हे सर्व धान्य देवाला अर्पण केल्यानंतर गरिबांना दान करावेत.

बातम्या आणखी आहेत...