आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फक्त धार्मिक नाही तर ऐतिहासिकदृष्ट्या महत्वपूर्ण आहे गोव्यातील मंगेशी मंदिर

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जीवन मंत्र डेस्क - गोवा आपल्या अप्रतिम समुद्र किनारे आणि जागतिक किर्ती प्राप्त असलेल्या चर्चमुळे ओळखले जाते. पण याठिकाणी ऐतिहासिक महत्व प्राप्त असलेले अनेक हिंदू मंदिरे सुद्धा आहेत. येथील मंगेशी मंदिर त्यातील एक आहे. मंगेश हे भगवान शंकराचे एक रूप आहे. गोव्याची राजधानी पणजीजवळ उभारलेले मंगेशी मंदिर भगवान शंकराला समर्पित आहे. येथे महादेव शिवलिंगाच्या रूपात स्थापित आहे. यापूर्वी हे शिवलिंग गोव्यातील कुशस्थली अर्थात कोर्तालिम येथे होते. पण पोर्तुगालांच्या हल्ल्यानंतर कौंडिन्य आणि वत्स गोत्राच्या सारस्वत ब्राम्हणांनी शिवलिंग स्थलांतरित केले. 


 

मंदिराचा इतिहास
इतिहास अभ्यासकांच्या मते, मोंगरी डोंगरातील हे मंदिर 18 व्या शतकात निर्माण करण्यात आले होते. तर एका धार्मिक मान्यतेनुसार एकदा भगवान शंकर येथे वाघाच्या रूपात देवी पार्वतीसमोर प्रकट झाले होते. देवी पार्वती त्यांना पाहून घाबरल्या आणि त्यांच्या मुखातून 'रक्षाम् गिरीश' (मदत करा गिरिजापती) शब्द निघाले. तेव्हापासून शंकराची मंगिरीश नावाने मंगेशी मंदिरात पूजा करण्यात येते.  

 

जाणकारांच्या मते, मंदिराला पोर्तुगालांच्या हल्ल्यापासून वाचविण्यासाठी शिवलिंगला मूळ मंदिरातून प्रियोलच्या सध्याच्या ठिकाणावर स्थलांतरित केले. 1560 मध्ये शिवलिंगाचे स्थलांतर करण्यात आले होते. सोंडे येथील राजाने मंदिरासाठी जमीन दान दिली होती. 1973 मध्ये मंदिरच्या घुमटावर सुवर्ण कलशाची स्थापना करण्यात आली. 


मंदिराची बनावट आणि महत्व
मंगेशी मंदिराची विशेष अशी वास्तुकला आहे. हे मंदिर गोव्यातील शांतादुर्गा मंदिराच्या शैलीत तयार करण्यात आले आहे. हे मंदिर 450 वर्ष जुने असल्याचे मानले जाते. या मंदिराची संरचना सरळ आणि शानदार आहे. मंदिरात अनेक घुमटं, स्तंभ आणि खिडक्या आहेत. येथे एक प्रमुख नंदी आणि मंदिराच्या मध्यात एक भव्य सात मजली दीपस्तंभ आहे. मंदिरात एक अप्रतिम पाण्याची टाकी आहे. या टाकीला मंदिरातील सर्वात जुना भाग मानले जाते. येथे एक मोठे सभागृह आहे. या सभागृहात अंदाजे 500 लोक उभे राहू शकतात. एकोणीसाव्या शतकातील झूमर या सभागृहाचे सौंदर्य वाढवते. सभागृहाचा मध्य भाग गर्भगृहकडे जातो. येथेच भगवान मंगेशाची प्रतिमा प्रतिष्ठित आहे. माघ महिन्यात येथे मोठ्या यात्रेचे आयोजन होत असते. 

बातम्या आणखी आहेत...