आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मंगळागौरी व्रत : सुख-समृद्धीसाठी शुभ योगात करा देवी पार्वतीचा खास उपाय

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्रावण मासातील प्रत्येक मंगळवारी मंगळागौरी व्रत केले जाते. हे व्रत विशेषतः नवविवाहित मुली करतात. यावर्षी हे व्रत 14, 21, 28 ऑगस्ट आणि 4 सप्टेंबरला आहे. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. प्रफुल्ल भट्ट यांच्यानुसार या वेळी मंगळागौरी व्रताच्या दिवशी विनायक चतुर्थी आणि अंगारक योग जुळून येत आहे. या व्रतामध्ये मुख्यतः देवी पार्वतीची पूजा केली जाते. महिला हे व्रत सौभाग्य वृद्धी आणि कुटुंबात सुख-शांती राहावे यासाठी करतात...


- मंगळवारी सकाळी लवकर उठून स्नान करून या व्रताचा संकल्प घ्यावा..मी पुत्र, पौत्र, सौभाग्य वृद्धी आणि श्री मंगळागौरीच्या कृपा प्राप्तीसाठी मंगळागौरी व्रत करण्याचा संकल्प करते.


- त्यानंतर देवी गौरी (पार्वती)चा फोटो किंवा मूर्ती एका चौरंगावर लाल कपड्यावर स्थापित करा. फोटोसमोर पिठाचा एक दिवा ठेवून त्यामध्ये सोळा वाती लावाव्यात. त्यानंतर खालील मंत्राचा उच्चार करावा..


कुंकुमागुरुलिप्तांगा सर्वाभरणभूषिताम्।
नीलकण्ठप्रियां गौरीं वन्देहं मंगलाह्वयाम्।


- त्यानंतर देवी पार्वतीची पूजा करावी. 16 लाडू, फळ, पान, विलायची, लवंग, सुपारी आणि मिठाई अर्पण करावी. त्यानंतर मंगळागौरी कथा ऐकावी.


- कथा झाल्यानंतर 16 लाडू आपल्या सासूला आणि इतर सामग्री ब्राह्मणाला द्यावी. त्यानंतर सोळा वातींचा दिवा लावून मंगळागौरीची आरती करावी.


हा उपाय करावा - 
मंगळवारी देवी पार्वतीच्या एखाद्या मंदिरात जाऊन सौभाग्य वस्तू- उदा. लाल ओढणी, लाल चुडा, मेहंदी, कुंकू इ. वस्तू अर्पण कराव्यात. यासोबत लाल गुलाबाचे फुल अर्पण करावे. यामुळे दुर्भाग्य दूर होते आणि सौभाग्य वाढते.

बातम्या आणखी आहेत...