आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आंबा, पपईच्या पानांद्वारे करा मधुमेह आणि डेंग्यूवर खात्रीलायक उपचार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मधुमेह आिण डेंग्यू या दोन आजारांवर आयुर्वेदात दाेन प्रकारच्या पानांना उपयोगी मानले गेले आहे. जाणून घेऊया उपचाराचा सोपा उपाय. 


आंब्याची पाने 
मधुमेह झाल्यावर रक्तातील साखरेचे प्रमाण वाढते. यामुळे शरीरातील इन्सुलिनच्या निर्मितीवर नकारात्मक प्रभाव पडतो. याला संतुलित करण्यासाठी आंब्याची पाने फायदेशीर आहेत. आंब्यांच्या पानांमध्ये एन्थोसाइनिडिन नावाचे टॅनिन असते. यात ग्लुकोज शोषून घेण्याचा गुण असतो. जे रक्तातील साखरेचे प्रमाण संतुलित करतात. यासाठी आंब्याच्या पानांना पाण्यात उकळून घ्या. रात्रभर तसेच राहू द्या, सकाळी गाळून प्यावे. 


पपईची पाने 
पपईच्या पानांमध्ये कायमोपापिन आिण पपेनसारखी एंजाइम्स असतात, ज्यामुळे पेशी वाढण्यास मदत होते. यामुळे यकृतही चांगले काम करते. डेंग्यूमध्ये पपईच्या पानांचा रसाचा औषध म्हणून उपयोग केला जातो. यासाठी या पानांचा उन्हात वाळवून घेऊन स्वच्छ धुऊन पाण्यात उकळून घेऊन गाळून प्यावे. 

बातम्या आणखी आहेत...