Home | Maharashtra | Kokan | Ratnagiri | mango-issue-in-kokan-region

कृषि विभागाच्या कारभारामुळेच आंब्याचे नुकसान

दिव्य मराठी टीम | Update - May 24, 2011, 07:05 PM IST

वेळीच योग्य मार्गदर्शन न मिळाल्याने आंब्याचे नुकसान झाल्याचे मत कृषि विभागाच्या समितीने व्यक्त केले.

  • mango-issue-in-kokan-region

    सिंधुदुर्ग- यंदा थंडीचा कालावधी लांबला असला तरी फुललेल्या मोहोरावर फवारणी करण्याचे मार्गदर्शन शेतक-यांना वेळीच न मिळाल्याने किडीच्या प्रमाणात वाढ झाली आणि फलधारणा योग्य प्रकारे होऊ शकली नाही. त्यामुळे आंब्यांचे 80 ते 85 टक्के नुकसान झाले, असे मत कृषि विभागाच्या समितीने व्यक्त केले.    सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हापूस आंबा नुकसानीची पाहणी करण्यासाठी केंद्र व राज्य सरकारच्या कृषी विभागांतील तज्ज्ञ अधिकाऱ्यांची समिती जिल्ह्यात आली होती. या समितीत केंद्रीय कृषी सहसचिव संजीव चोप्रा, फलोद्यान आयुक्त डॉ. गोरख सिंग या वरिष्ठ अधिका-यांसह महाराष्ट्र फलोत्पादन संचालक डॉ. बकवाड, प्रकल्प संचालक महावीर जंगटे, ठाण्यातील कृषी अधिकारी विभागीय कार्यालयाचे अधीक्षक जे. जे. जाधव या अधिका-यांचा समावेश होता. त्यांनी दोन दिवस जिल्ह्यात ठिकठिकाणी आंबा नुकसानीबाबत पाहणी दौरा केला.    वेंगुर्ला तालुक्यात मठ, मालवण तालुक्यातील कुंभारमाठ, देवगड तालुक्यातील जामसंडे, कोळोशी या भागांत आंबा बागायतींची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी ही माहिती दिली.Trending