आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चौघे तिच्यावर जनावरांसारखे तुटून पडले, गँगरेप होताना हात जोडून म्हणाली- काहीही करा, पण ठार मारू नका; तरीही नराधमांनी दगडांनी ठेचली तिची कवटी...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

केपटाऊन - दरोडा, हत्या आणि सामूहिक बलात्कार प्रकरणी कोर्टात हजर करण्यात आलेल्या आरोपींचा कबुली जबाब ऐकूण सर्वांनाच धक्का बसला आहे. गेराल्डो पार्सन (27), वेर्नन विटबूई (33), नॅशविले जुलियस (29) आणि इबन व्हॅन नीबर्क (28) या चार नराधमांना बुधवारी केपटाऊन हायकोर्टात सादर करण्यात आले. त्यांनी मे 2017 मध्ये एका 27 वर्षीय विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार करून तिची निर्घृण हत्या केली. तसेच तिच्या मित्राला देखील मेल्याचे समजून सोडून गेले होते. या घटनेच्या दीड वर्षांनंतर त्या दिवशी नेमके काय घडले याची संपूर्ण माहिती कोर्टात मांडण्यात आली. 
 

आणि आरोपीला रडू कोसळले...
चार मुख्य आरोपींपैकी एक गेराल्डोला भर कोर्टात रडू कोसळले आणि त्याने त्या दिवशी घडलेला संपूर्ण घटनाक्रम न्यायाधीशांसमोर मांडला. गेराल्डो म्हणाला, "तिच्यावर बलात्कार करणार असे आम्ही ठरवलो नव्हतो. आम्हाला फक्त तिची कार हवी होती. मला एक गर्लफ्रेंड आणि मुलगा देखील आहे. तरीही घाई गर्दीत सर्व काही घडून गेले. तिचा मित्र मार्शला सोडण्यासाठी आली असताना आमची नजर तिच्या कारवर होती. परंतु, स्क्रू ड्रायव्हर आणि धारदार चाकू पाहून ती प्रचंड घाबरली होती. आपला जीव वाचवण्यासाठी ती काहीही करण्यास तयार होती. त्यामुळेच आम्ही तिच्यावर बलात्कार केला." 


आजीने गिफ्ट केलेली कार सोडण्यास तयार नव्हती हॅना...
> मे 2017 मध्ये दक्षिण आफ्रिकेतील एका महाविद्यालयात BA सेकंड इयरला शिकत असलेली हॅना कॉर्नेलिअस (21) आपला वर्गमित्र चेसलिन मार्श (22) याला घरी ड्रॉप करण्यासाठी गेली होती. निळ्या फोक्सवॅगन सिटी गोल्फ कारमध्ये आलेली हॅना मित्रासोबत कार पार्क करण्याचा प्रयत्न करत होती. त्याचवेळी अचानक 4 दरोखेर येऊन धडकले. 
> चौघांपैकी दोन जणांनी कारचे दरवाजे उघडले. दोघांपैकी एकाने हॅनाच्या चेस्टवर स्क्रू ड्रायव्हर लावला. तर दुसऱ्याने मार्शच्या मागून गळ्यावर चाकू ठेवला. दोघांनाही कारमधून बाहेर पडण्यास सांगितले. मार्श बाहेर पडला. परंतु, हॅना कार सोडण्यास तयारच नव्हती. तिला ही कार तिच्या आजीने गिफ्ट केली होती. 


म्हणाली- सेक्स करा, काहीही करा पण Please... मला जाऊ द्या...
> चौघांपैकी एकाने तिचा मित्र मार्शला मागे गाडीच्या डिक्कीत बंद केले. एक जण ड्रायव्हरच्या सीटवर आणि दुसरा त्याच्या बाजूला बसला. तर उर्वरीत दोघांनी छोट्याशा कारमध्ये मागे हॅनाला घट्ट पकडले होते. अतिशय थंड डोक्याने कार लुटण्यासाठी आलेल्या या दरोडेखोरांनी एका ठिकाणी थांबून अमली पदार्थ विकत घेतले. यानंतर एका ठिकाणी नेऊन मार्शचा उलटे झोपवले. त्याचे तोंड उघडे करून एका दगडावर ठेवले आणि विटांनी कवटीच्या मागच्या बाजूने जोरदार प्रहार केले. मार्श मेल्याची खात्री पटली नाही तोपर्यंत ते त्याला मारत होते. 
> आपल्या मित्रावर झालेल्या इतक्या क्रूर हल्ल्याने हॅना स्तब्ध झाली होती. आपल्यालाही हे लोक असेच मारतील या भीतीने ती वेड्यासारखे वागत होती. थोडे पुढे गेल्यानंतर ती हात जोडून नराधमांना याचना करत होती की "प्लीज, मला मारू नका. माझ्यासोबत सेक्स करू शकता. काहीही करू शकता. पण, मला मारू नका." गेराल्डो कोर्टात म्हणाला, "आमच्यापैकी कुणीही तिच्यावर बलात्कार करण्यासाठी नव्हे, तर फक्त कार चोरून पळून जाण्यासाठी गेलो होतो. परंतु, तिला अशा विवश अवस्थेत पाहून सर्वप्रथम मीच तिच्यावर बलात्कार केला. यानंतर माझ्या तिन्ही सहकाऱ्यांनी एक-एक करून तिची अब्रू लुटली. अत्याचार सुरू असतानाही ती वारंवार मला ठार मारू नका. मला जाऊ द्या. असेच बडबडत होती." 


मग केली इतकी निर्घृण हत्या...
गेराल्ड कोर्टात रडत-रडत बोलत होता. "यानंतर आम्ही कार एका मोकळ्या मैदानात नेली. हॅनाला कारबाहेर फेकून पळून जाणे हा आमचा प्लॅन होता. परंतु, हॅना आपली कार सोडण्यास तयार नव्हती. ती प्रचंड घाबरली होती आणि तिला काहीच सूचत नव्हते. तेवढ्यात अचानक ईबन मागून आला आणि त्याने हॅनाच्या गळ्यावर चाकू मारला. तिच्या गळ्यातून रक्त वाहत असल्याचे पाहून मी तिला दूर ढकललो आणि पळून जाण्यास सांगितले. त्याचवेळी वेर्नन एक मोठा दगड घेऊन आला. मी वेर्ननला सांगितले, हिला मारू नकोस आपण आधीच मार्शला मारून आलोय. तरीही वेर्नन तो दगड तिच्या डोक्यात घातला. तोही इतक्या जोरात की तिच्या कवटीचे तुकडे झाले." पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तरीही हॅना जीवंत वाचू नये याची खात्री करून घेण्यासाठी हल्लेखोरांनी तिचा गळा चिरला. 


अन् मार्श वाचला! अशी झाली नराधमांना अटक
मार्शचा मृत्यू झाल्याचे समजून हल्लेखोर त्याला तशाच अवस्थेत सोडून गेले होते. परंतु, काही तासानंतर मार्श शुद्धीवर आला. त्याच्या गळ्यावर आणि डोक्याला गंभीर इजा झाली होती. त्याला समोरचे काहीच स्पष्ट दिसत नव्हते. चालणे देखील कठिण झाले होते. तशाच अवस्थेत त्याने जवळचे एक घर गाठले आणि पोलिसांना मदतीसाठी बोलावले. पोलिस येताच हॅना कुठे आणि कशी आहे असा प्रश्न त्याने विचारले. यावर काहीच न बोलता पोलिस त्याला घटनास्थळी घेऊन गेले. त्या ठिकाणी हॅनाचा मृतदेह होता आणि पोलिसांनी तो परिसर सील केला होता. या घटनेनंतरही मोकाट फिरताना त्या दरोडेखोरांनी आणखी तीन महिलांना लुटले होते. काही दिवसांतच गस्तीवर असलेल्या पोलिसांना हॅनाची कार सापडली. त्या कारचा पाठलाग करून त्यांनी तीन आरोपींना अटक केली. त्यांची चौकशी केल्यानंतर चौथ्या आरोपीला सुद्धा अटक करण्यात आली. या प्रकरणीच सुनावणी सध्या सुरू आहे. 

 

बातम्या आणखी आहेत...