आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
पुणे - प्रथमच विधानसभा लढवत असलेल्या संभाजी ब्रिगेडने ४० जागी उमेदवार दिले आहेत. पक्षाने जाहीरनाम्यात अनेक घाेषणांचा पाऊस पाडलाय. सर्वांना माेफत शिक्षण, शेतीला वीज-पाणी २४ तास माेफत, शेतमालाला हमीभाव, दारूमुक्त गाव, राेजगार, स्वयंराेजगारास विनातारण कर्ज, कुशल मनुष्यबळ निर्मितीसाठी स्वतंत्र संस्थांची उभारणी आदी आश्वासने या पक्षाने दिली आहेत.
प्रदेशाध्यक्ष अॅड. मनाेज आखरे, कोषाध्यक्ष संतोष गाजरे यांनी पत्रकार परिषदेत जाहीरनामा प्रकाशित केला. आखरे म्हणाले, ‘सत्ताधारी व विरोधी पक्षांकडे शेतकरी, बेरोजगार, महिला शिक्षण, लोकहिताचे निर्णय घेण्याची दृष्टी दिसत नाही. काँग्रेस व राष्ट्रवादीने भ्रष्टाचाराचा अतिरेक केला, तर भाजप-शिवसेना सरकारने नोटबंदी, जीएसटीसारखे मूर्खपणाचे निर्णय घेऊन देशाला आर्थिक संकटात ढकलले आहे.’
जाहीरनाम्यातील आश्वासने
> सर्व समाजघटकांना केजी ते पीजी माेफत शिक्षण
> सर्व सरकारी कर्मचारी तसेच लाेकप्रतिनिधींच्या पाल्यांना सरकारी शाळेत शिक्षण अनिवार्य
> विनाअट शेतकरी कर्जमाफी
> शेतीसाठी कृषी अर्थसंकल्प
> कंत्राटी नाेकर भरती बंद, सर्व कायमस्वरूपी नाेकऱ्या
> ग्रामीण भागात उद्याेगनिर्मिती, स्थानिकांना १००% राेजगार
> महिला सुरक्षेसंबंधी कायदे करून अंमलबजावणी
> कर्जबुडव्या उद्याेगपतींना अटक, संपत्ती जप्त करू
> आेबीसींसह सर्व वर्गांची जातीनिहाय जनगणना करणार, वंचितांना लाेकसंख्येनुसार आरक्षण
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.