आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Manikarnika Costume Designer Neeta Lulla Talks About Dressing Of Kangana Ranut

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

झाशीच्या राणीचा पारंपरिक लूक चर्चेत, 'मणिकर्णिका'साठी कंगनाने घातला 20 किलोचा वजनदार पोशाख, नऊवारी साडीतही दिसणार

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कंगना रनोट 'मणिकर्णिका' चित्रपटात पारंपरिक रूपात दिसणार आहे. यात तिने टिपिकल मराठी स्टाइलचे दागिने आणि साडी घातली आहे. याव्यतिरिक्तदेखील तिने योद्धाच्या लूकसाठी वजनदार पोशाख घातला आहे. कंगनाचा हा पोशाख राष्ट्रीय पुरस्कार विजेती नीला लुल्लाने डिझाइन केला आहे. यापूर्वी तिने 'मोहेंजो दारो', 'जोधा अकबर' आणि 'देवदास'सारख्या चित्रपटातदेखील पोशाख डिझाइन केला होता. 'मणिकर्णिका'साठी वापरण्यात आलेल्या पोशाखाविषयी नीताने संागितले की, आम्ही कंगनासाठी चार लूक डिझाइन केले होते. वेगवेगळ्या रंगांचा वापर करून आम्ही तिला असाधारण बनवून टाकले. 'मणिकर्णिका' लग्नाच्या आधी विविध रंगांच्या पोशाखात दिसेल. याची आम्ही आधीच तयारी करून ठेवली होती.

 

लग्नानंतर तिचा लूक थोडा भडक केला आहे. यात आम्ही खासकरून केशरी आणि लाल रंगाचा वापर केला आहे. तिसरा लूक म्हणजे ती आईच्या रूपात दिसणार आहे. त्यामुळे आम्ही थोड्या कमी रंगाचा वापर केला. शेवटच्या आणि चौथ्या लूकमध्ये तिला गडद रंगाची साडीत दाखवले आहे. कारण हा लूक तिच्या राणी होण्याचा लूक आहे. यात ती नऊवारी साडीत दिसणार आहे. 

 

10 किलोपेक्षा जास्त वजनदार साडी आणि 20 किलोपेक्षा जास्त वजनदार राजेशाही दागिने 
कंगना लग्नानंतर वजनदार पोशाखात दिसते. ही नऊवारी साडी आहे, तिचे वजन 10 किलो आहे. या पोशाखावर दागिनेदेखील तितकेच वजनदार आहेत. हे दागिने महाराष्ट्रीयन आहेत. याचे वजनही 10 किलो आहे. याशिवाय तिने काही 4 ते 5 हेअर अॅक्सेसरीज लावल्या आहेत. हे सर्व मिळून 20 किलोचे दागिने झाले आहेत.

 

नऊवारी साडीत दिसणार कंगना... 

या चित्रपटात कंगना पारंपरिक नऊवारी साडी घालताना दिसणार आहे. याविषयी नीताने सांगितले..., नऊवारी साडी 9 मीटरची आहे आणि बारावरी साडी 12 मीटरची आहे. मराठी चित्रपट 'बाल गंधर्व' (2011) मध्ये मी या महाराष्ट्रीयन साड्या घालायला शिकले होते. या शिवाय यात पैठणी साडीही यात दिसणार आहे. राजघराण्यातील महिला साडीवर नेहमी शॉल शेला घ्यायच्या त्यामुळे आम्हीदेखील यात शेलाचा वापर केला आहे. 

 

या अभिनेत्रींनीदेखील घातले वजनदार पोशाख 

 

दीपिका पदुकोण - 'पद्मावत' 
'पद्मावत' चित्रपटात दीपिका पदुकोणने 11 किलोचा घागरा आणि चार किलोची ओढणी घातली होती. याशिवाय तिने 20 किलोचे दागिने घातले असते तर एकूण वजन 35 किलोने वाढले असते. या वजनदार पोशाखातच दीपिकाने 12 ते 14 तास शूटिंग केले. 

 

अनुष्का शर्मा - 'बॉम्बे वेलवेट' 
या चित्रपटात अनुष्काने 35 किलोचा गाउन घातला होता. हा वजनदार गाऊन 'द डर्टी पिक्चर'साठी राष्ट्रीय पुरस्कार जिंकणारी डिझायनर निहारिकाने डिझाइन केला होता. शूटिंगमध्ये हा गाऊन घालण्यासाठी अनुष्काला दोन लोकांची मदत लागायची. 

 

माधुरी दीक्षित - 'देवदास' 
माधुरी दीक्षितने 2002 मध्ये आलेल्या 'देवदास'मध्ये कमीत कमी 30 किलोचा लहंगा घातला होता. एवढेच नव्हे, तर तिने इतका वजनदार लहंगा घालून बहारदार नृत्यदेखील केले होते. या लहंग्याची किंमत 20 लाख रुपये होती.