Movie Review:लक्ष्मीबाई बनलेल्या / Movie Review:लक्ष्मीबाई बनलेल्या कंगना रनोटचा पावरफुल परफॉर्मेंस, कमकुवत आहे फर्स्ट हाफ पण क्लायमॅक्स दमदार

Jan 25,2019 01:31:00 PM IST
स्टार रेटिंग 3.5/5
कलाकार कंगना रनोट, अंकिता लोखंडे, अतुल कुलकर्णी, जीशान अयूब, डैनी डेन्जोपा,सुरेश ओबेरॉय
दिग्दर्शक कायरोस कंटेंट स्टूडियोज
निर्माता शंकर-एहसान-लॉय
जॉनर ड्रामा-हिस्ट्री
कालावधी 148 मिनिटे


बॉलिवूड डेस्क. मणिकर्णिकाची कहाणी सन 1800 च्या काळातील आहे. यामध्ये निर्भिड राणी लक्ष्मीबाईंची कथा दाखवण्यात आली आहे. लक्ष्मीबाईंनी एकट्याने ब्रिटिश राज्याविरुध्द आवाज उठवला होता. त्यांनी झांसीमध्ये पसरलेल्या आपल्या साम्राज्याला इंग्रजांपासून वाचवण्यासाठी मोठा लढा दिला होता. या लढाईमध्ये त्यांना गौस खान, तात्या टोपे आणि झलकारी बाईने साथ दिली होती. चित्रपटात कंगाने लक्ष्मीबाईची भूमिका साकारली आहे. तर सदाशिव रावची भूमिका जीशान अयूब, घौस खानची भूमिका डॅनी डेन्जोपा, तात्या टोपीची भूमिका अतुल कुलकर्णी आणि झलकारी बाईची भूमिका अंकिता लोखंडेने साकारली आहे.

चित्रपटात काय खास

1. चित्रपटाचा फर्स्ट हाफ स्लो आहे आणि हिच चित्रपटाची सर्वात मोठी कमजोरी आहे. कमकुवत एडिटिंग आणि अधुन-मधून चित्रपटाची कथा बळजबरीने टिपिकल बॉलिवूड स्टाइलमध्ये रंगवण्याचा प्रयत्न केला आहे. यामुळे चित्रपटाचा दमदारपणा कमी होतो. झलकारी बाई मणिकर्णिकाला भेटते तेव्हा तिचा आयटम नंबर विनाकारण दाखवण्यात आला आहे. याची तिळमात्र गरज नव्हती. बाहुबलीचे रायटर विजयेंद्र प्रसाद यांनी लिहिलेला चित्रपटाचा स्क्रीनप्ले टू द पॉइंट आहे. पण कहाणी अधुन-मधून मेलो ड्रामाचे रुप घेते. पण नंतर चित्रपटात असे काही जबरदस्त सीन्स आहेत, जे तुम्हाला विशेष लक्षात राहतील.


2. कंगना लक्ष्मीबाईंच्या भूमिकेत एकदम परफेक्ट बसली आहे. तिने स्वतःला लक्ष्मीबाईंच्या भूमिकेत वाहवून घेतले आहे. प्रत्येक सीनमध्ये तिची प्रचंड मेहनत स्पष्ट दिसते. अॅक्शन सीन्स असो किंवा इमोशनल कंगना आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या डोळ्यांचे पारणे फेडते. अंकिताने झलकारी बाईंची भूमिका उत्कृष्ठ साकारली आहे. पण तिची भूमिका खुप लहान आहे. तिच्या पात्रानुसार तिची बॉडी लॅग्वेज जबरदस्त आहे. बाजीरावच्या भूमिकेला सुरेश ओबेराय आणि गौर खानच्या भूमिकेला डॅनीने न्याय दिला आहे. पण चित्रपटाचा पुर्ण फोकस फक्त कंगनाच्या पात्रावर करण्यात आले आहे. मणिकर्णिकाचा पती गंगाधर रावची भूमिका जिस्सू सेनगुप्ताने साकारली. त्याचा अभिनय थोडा कमकुवत वाटतो.

3. यासोबतच 18 व्या शतकातीच्या हिशोबाने दाखवण्यात आलेले चित्रण जबरदस्त आहे. प्रत्येक बारीक गोष्टींकडे विशेष लक्ष देण्यात आले आहे. प्रसून जोशी यांनी लिहिलेले चित्रपटाचे डायलॉग देशभक्तीने भरपूर आहे. जर चित्रपटाच्या पहिल्या हाफवर लक्ष दिले असते तर चित्रपट अजून चांगला बनू शकला असता. पण सेकंड हाफ तुम्हाला चित्रपट शेवटपर्यंत पाहण्यास भाग पाडतो. तुम्हाला लक्ष्मीबाईंची कथा अनुभवण्याची संधी मिळते.

X