माणिकराव गावित यांचे स्वीय सहायक भगवान गिरासे यांचा गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न, प्रकृती नाजूक 

मुंबईहून बेपत्ता झाले होते, 1 एप्रिलला पहाटे नवापूर रेल्वे स्टेशनवर आढळून आले

प्रतिनिधी

Apr 05,2019 12:17:00 PM IST

नवापुर : येथील माजी केंद्रीय गृह राज्य मंत्री माणिकराव गावित यांचे स्वीय सहायक मुंबईहून बेपत्ता झाले होते. १ एप्रिल रोजी पहाटे चार वाजेच्या सुमारास नवापूर रेल्वे स्थानकावर आढळून आल्याने भगवान रामचंद्र गिरासे यांची सुखरूप घरी परतले होते. चार दिवसांपासून कोणाजवळ काही बोलत नव्हते परिवार सोबत देखील कमी बोलत होते. शुक्रवारी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास अचानक राहत्या घरात गळफास घेतला. घरातील सदस्यांनी लगेच त्यांना पकडले दोरी कापली आणि तात्काळ नवापूर शहरातील खाजगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. परिस्थिती नाजूक आहे. डाॅक्टर गिरासे यांच्यावर उपचार करीत आहे. गळफास घेण्याचे कारण असून समजून शकले नाही.


३० मार्च शनिवार रोजी मुंबई येथील टिळक भवनात काॅग्रेस पक्षाच्या कार्यालयात पक्ष श्रेष्ठिच्या भेटीसाठी माजी केंद्रीय गृह राज्य मंत्री माणिकराव गावित आपल्या परिवारा सोबत पक्षश्रेष्ठी यांना भेटण्यासाठी गेले होते त्या वेळी त्यांचे स्वीय सहाय्यक भगवान गिरासे देखील हजर होते. भेटीनंतर संपूर्ण परिवार दादरहुन निघत असताना भगवान गिरासे यांनी तीन गाडया रवाना ही केल्याचे म्हटले आहे.काही वेळात बेपत्ता झाल्याचे लक्षात येताच त्यांची शोधा मोहीम सुरु झाली.परंतू त्याचा मोबाइल फोन ही बंद असल्याचे दाखवत असल्याने दादर येथील पोलिस ठाण्यात हरवल्याची नोंद करण्यात आली ह्या घटनेने चांगलीच खळबळ उडाली होती.

X
COMMENT