आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गावित परिवार काँग्रेस पक्ष सोडणार नाही, भरत गावित अपक्षही लढणार नाहीत, माणिकराव गावित

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवापूर- नंदुरबार लोकसभा मतदारसंघात काॅग्रेस पक्षाचे तिकीट न मिळाल्याने माजी केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री माणिकराव गावित यांचे पुत्र भरत गावित यांनी अपक्ष उमेदवारी करण्याचा निर्णय घेतला होता. विरोधकांनी यावरून चांगलेच राजकारण केले.

 

भरत गावित भाजपला मदत करणार आहे, अशा पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल करून जनतेत संभ्रम निर्माण केला. यावर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माणिकराव गावित यांनी शुक्रवारी स्पष्टीकरण दिले आहे. भरत गावित यांच्यासह गावित कुटुंबातील कोणताही सदस्य काॅग्रेस पक्ष सोडला नाही. तसेच भरत गावित अपक्षही लढणार नाहीत, असेही माणिकराव गावित यांनी स्पष्ट केले आहे. विरोधक चुकीचे वृत्त पसरवून आमची प्रतिमा खराब करण्याचे काम करत असल्याचे माणिकराव गावित यांनी 'दिव्य मराठी'शी बोलताना सांगितले.

 

नंदुरबार लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसमधील अंतर्गत बंडाळी समक्ष होण्यासाठी आता युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू झाले आहेत. याचा दृश्य परिणाम हे दिसून येत आहे. माजी केंद्रीय मंत्री माणिकराव गावित यांचे चिरंजीव भरत गावित यांनी 30 मार्च रोजी म्हणजेच उद्या आयोजित केलेला मेळावा हा पुढे ढकलला आहे. कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव आपण हा मेळावा पुढे ढकलल्याच भरत गावित सांगत आहेत. त्यांनी उमेदवारी करू नये यासाठी प्रचंड दबाव निर्माण केला जात आहे. भरत गावित यांचे वडील माणिकराव गावित यांनी पक्ष सोडणार नसल्याचे सांगत भरत अपक्ष उमेदवार नाहीत, असे स्पष्ट केले आहे.

 

अजून बंडाचे निशाण खाली ठेवले नाही- भरत गावित

कार्यकर्त्यांशी चर्चा करून अंतिम निर्णय घेणार असल्याचे भरत गावित यांनी स्पष्ट केले आहे. अजून बंडाचे निशाण खाली ठेवलेले नाही. मात्र त्यांचा हा बंड आणि आक्रमकता काहीशी सौम्य झाली आहे, असे दिसून येत आहे.

 

गावित परिवाराने काँग्रेस मधील अंतर्गत राजकारणावर प्रचंड नाराजी व्यक्त केली. आम्ही पक्षाकडे केवळ न्यायची अपेक्षा केली होती. काँग्रेस पक्ष सोडण्याचे वक्तव्य केले नाही. मरेपर्यंत काॅग्रेस पक्षात काम करू.असे मत गावित परिवाराचे व्यक्त केले.

बातम्या आणखी आहेत...