आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराटीव्ही डेस्कः ज्या शोमध्ये एकेकाळी सूत्रसंचालक म्हणून काम केले आज त्याच शोमध्ये पाहुण्या कलाकार म्हणून आमंत्रण मिळणे कोणत्याही कलाकारासाठी मोठी गोष्ट असते. तो मान मनीष पाॅल याला मिळाला आहे.
मनीष पॉल मनोरंजन जगताचा सर्वात आवडता अँकर आहे. तो आता एका रिअॅलिटी शोमध्ये परीक्षकाच्या भूमिकेत दिसणार आहे, त्या शोमध्ये त्याने आधी अँकरिंग केली होती, आता तेथेच तो पाहुणा म्हणून येणार आहे. त्यामुळे मनीष खूप खुश आहे. मनीषने आतापर्यंत मोठे-मोठे पुरस्कार सोहळे, स्पोर्ट्स शोज आणि दबंग सारखे शो केले आहेत. त्यामुळे त्याला चांगली मागणी आहे. गेल्या वर्षी त्याचा 'मूवी विद मनीष पॉल'देखील यशस्वी ठरला होता. शोमध्ये त्याने खूप मस्ती केली हाेती. नवीन वर्षातदेखील त्याला मोठे यश मिळाले आहे,कारण इंडियन आयडलने त्याला सेलिब्रिटी म्हणून आमंत्रण दिले आहे. ही बाब त्याच्यासाठी खूपच खास आहे कारण 2018 मध्ये त्याने या शोमध्ये अँकरची भूमिका साकारली होती. नुकतेच त्याने या कार्यक्रमाचे शूटिंग पूर्ण केले आहे.
मनीष याविषयी म्हणाला, मला नवीन वर्षाकडून बऱ्याच अपेक्षा आहेत. वर्षाच्या सुरुवातीला मला आनंदाची बातमी मिळाली, हे माझ्यासाठी मोठे यश आहे. इंडियन आयडलमध्ये जजच्या भूमिकेत जाणे माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. कारण हा एक मोठा आणि प्रतिष्ठित मंच आहे. या शोमध्ये सर्वांनीच माझे मनापासून स्वागत केले. मला स्वत:ला गाणे आवडते आणि संगीताविषयी माझी आवड पहिल्यापासून आहे. 2018 मध्ये मी या शोमध्ये होस्ट म्हणून काम केले आहे. त्याच मंचावर आज मला पाहुण्याच्या भूमिकेत बोलावले जात आहे. मी पहिला होस्ट असेल ज्याला अशा प्रकारचा सन्मान मिळाला असे मला वाटते. परीक्षकाच्या खुर्चीवर बसल्यानंतर कळाले की तेथे बसल्यावर निर्णय घेणे किती अवघड असते. यावेळी सेटवर थाेडा नर्वस झालाे होताे. यावेळी मी शोच्या इतर परीक्षकांसाेबत खूप मजा केली. विशाल म्हणाला, माझ्या टक्कलपणाची थट्टा करण्यासाठी मनीष परत आला आहे, नेहाबरोबर मजा केली, आदित्यबरोबरही मजा केली. सर्व कॉन्स्टंट्स मला पाहून खूप आनंदी झाले, म्हणून मी खूप मजा केली. पुढे मी माझ्या कामामध्ये यासारखे आणखीन नवीन परिमाण जोडण्याचा प्रयत्न करेन. मला माझ्या चाहत्यांचे आभार मानायला आवडेल. त्यांच्या प्रेमामुळेच मी इथपर्यंत आलो.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.