आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

थिएटर ऑफ रेलेवन्स...

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

समाजाच्या ‘फ्रोझन स्टेट' ला तोडण्यासाठी "थिएटर ऑफ रेलेवन्स’ आपल्या कलात्मकतेने विवेकाच्या मातीत विचाराचे रोप लावण्यासाठी प्रतिबद्ध आहे. जागतिकीकरणाने संपूर्ण जगातील जनकल्याण, मानव अधिकार, न्याय आणि संविधानिक संप्रभुतेची सर्व संस्थानं उद्ध्वस्त केली आहेत. सरकारांना नफेखोरीची दलाली करण्याचे महत्त्वपूर्ण दायित्व सोपवले आहे. मीडियाला फक्त सरकारच्या जनसंपर्क विभागाची जबाबदारी दिली. त्यांचे काम सरकारला प्रश्न विचारणे नाही सरकारची जयकार लावणे आहे. अशा वेळी जनतेच्या आवाजाचे मंच बनले ‘थिएटर ऑफ रेलेवन्स’! या आवाजाला नुकतीच २७ वर्षे पूर्ण झाली, त्यानिमित्त...
 

‘थिएटर ऑफ रेलेवन्स’ ने  लोकामध्ये रंगचेतना जागृत केली, नाटक लोकांशी जोडले.  नाट्य कार्यशाळांतून सहभागी लोकांना व जीवनाचा संबंध, नाट्यलेखन, अभिनय, निर्देशन, समीक्षा, नेपथ्य, रंगशिल्प, रंगभूषा इत्यादी विविध रंगमंचीय पैलू अवगत करण्यासाठी प्रशिक्षण दिले.
 
२७ वर्षांपूर्वी म्हणजे १९९२ मध्ये जागतिकीकरणाच्या अजगराने प्राकृतिक संसाधनांना गिळंकृत करण्यासाठी आपला फणा जगभरात पसरविला. भांडवलदारांनी जगाला केवळ खरेदी आणि विक्रीपर्यंत मर्यादित केले. तर्काचे किल्ले ढासळले आणि आस्थेचं मंदिर निर्माण करण्यासाठी आंदोलन सुरू झाले होते. भारतातही आस्था परम उंचीवर होती आणि राम मंदिर निर्माणाच्या बहाण्याने विकारी लोकांनी सत्तेवर काबीज होण्यासाठी आपला मार्ग मोकळा केला होता..यात पहिले टार्गेट झाले भारताचा मूलभूत-पायाभूत तत्व सर्वधर्मसमभाव सिध्दांत. ६ डिसेंबर १९९२ हा सर्वधर्मसमभाव असणाऱ्या भारतासाठी काळा दिवस ठरला. भीषण सांप्रदायिक दंगलींत देश होरपळला, ज्यात धर्मनिरपेक्षता खाक झाली आणि धर्मांधतेने आपले हात पाय पसरले. अशा काळात मानवतेची ललकारी बनला "थिएटर ऑफ रेलेवन्स नाट्यसिध्दांत'!

जेव्हा जागतिकीकरण सर्व सिद्धांतांना नष्ट करत होते अशा काळात एका नाट्य सिध्दांताचा सुत्रपात करून त्याला क्रियाशील करण्याचे आव्हान हिमालयापेक्षा कमी नव्हते. परंतु ज्या सिद्धांताचा पाया प्रेक्षक असतात साहजिकच त्याचे जिवंत राहणे शक्य आहे. जागतिकीकरणाचा अर्थ आहे एकाधिकार वाद, वर्चस्ववाद, विविधतेचा खात्मा. कोणत्याही विरोधाला शत्रू मानणे, प्रश्न विचारणाऱ्याला देशद्रोही घोषित करणे. मनुष्याला वस्तू मानणे आणि मनुष्याला मानव अधिकारातून बेदखल करून एका कळपात स्थापित करणे, ज्याचे नाव आहे "मार्केट' जे सत्ताधीशांसाठी मेंढ्यांची गर्दी असते जयकारे लावण्यासाठी. 

जागतिकीकरणाने संपूर्ण जगातील जनकल्याण, मानव अधिकार, न्याय आणि संविधानिक संप्रभुतेची सर्व संस्थानं उध्वस्त केली आहेत. सरकारांना नफेखोरीची दलाली करण्याचे महत्वपूर्ण दायित्व सोपवले आहे. मीडियाला फक्त सरकारच्या जनसंपर्क विभागाची जबाबदारी दिली. त्यांचे काम सरकारला प्रश्न विचारणे नाही सरकारची जयकार लावणे आहे. अशा वेळी जनतेच्या आवाजाचे मंच बनले ‘थिएटर ऑफ रेलेवन्स’!
मागील २७ वर्षांपासून सतत कुठल्याच सरकारी, नीम सरकारी, कॉर्पोरेटफंडिंग किंवा कोणत्याही देशीविदेशी अनुदानाशिवाय आपली प्रासंगिकता आणि आपल्या मूल्यांच्या बळावर हे नाट्यतत्व देश विदेशात आपले अस्तित्व सिद्ध करीत आहे आणि बघणाऱ्यांना आपल्या असण्याचे औचित्य सांगत आहेत. सरकारच्या ३०० ते हजार कोटीच्या अनुमानित संस्कृती संवर्धन बजेटच्याविरुद्ध प्रेक्षक सहभागाने उभे आहे हे रंग आंदोलन ... मुंबईपासून मणिपूर पर्यंत!

"थिएटर ऑफ रेलेवन्स" ने जीवनाला नाटकाशी जोडून लोकामध्ये रंगचेतना जागृत केली, नाटक लोकांशी जोडले.  आपल्या नाट्य कार्यशाळांतून  सहभागी लोकांना (सहभागींना) व जीवनाचा संबंध, नाट्य लेखन, अभिनय, निर्देशन , समीक्षा, नेपथ्य, रंगशिल्प, रंगभूषा इत्यादी विविध रंगमंचीय पैलू अवगत करण्यासाठी प्रशिक्षण दिले. कलात्मक क्षमतेचे दैवी वरदान हटवून तिला  वैज्ञानिक दृष्टिकोनाकडे वळवले.  या  २७ वर्षांत सोळा हजारपेक्षा जास्त रंगकर्मींनी तब्बल हजार कार्यशाळांत भाग घेतला. भांडवलदारी कलाकार कधीच आपली कलात्मक जबाबदारी घेत नाहीत. म्हणूनच “कलेसाठी कला” या चक्रव्यूहात अडकतात.  भोगवादी कलेच्या चक्रात अडकून संपून जातात. “थिएटर ऑफ रेलेवन्स" ने “कलेसाठी कला” सारख्या उपनिवेशी व भांडवलवादी  विचाराचा  चक्रव्यूह आपल्या तत्वांनी व सार्थक प्रयोगांनी भेदला आहे.  हजारों ‘रंग संकल्पना' जोपासल्या आणि अभिव्यक्त केल्या. आतापर्यंत २८ नाटके सोळा हजारपेक्षा जास्त  वेळा रंगमंचावर आणले आहेत.

भांडवलशाही सत्तेचे "जागतिकीकरण" हे ‘विचाराला कुंद, खंडित आणि मिटवण्याचे षडयंत्र आहे. तंत्राच्या रथावर स्वार होऊन विज्ञानाच्या मूळ संकल्पनांचा विनाश करण्याचा कट रचत आहे. मानव विकासासाठी पृथ्वी आणि पर्यावरणाचा विनाश, प्रगतिशीलतेला केवळ सुविधा आणि उपभोगामध्ये बदलण्याचा खेळ आहे. फॅसिस्ट ताकदीचे परिणाम आहे जागतिकीकरण! लोकतंत्र, लोकतांत्रीकरणाच्या संविधानिक परंपरांची खिल्ली म्हणजे “जागतिकीकरण”! अशा भयावह काळात माणुसकी टिकवणे एक आव्हान आहे... या आव्हानासमोर उभे आहे “थिएटर ऑफ रेलेवंस’ नाट्य सिद्धांत.

सांप्रदायिक मुद्द्यावर ‘दूर से किसी ने आवाज़ दी’, बाल मजुरी वर ‘मेरा बचपन’, घरगुती हिंसेवर ‘द्वंद्व’, आपल्या अस्तित्वाचा शोध घेत अर्ध्या लोकसंख्येचा आवाज ‘मैं औरत हूँ’ , ‘लिंगनिदान’ या विषयावर नाटक ‘लाडली’, जैविक आणि भौगोलिक विविधतेवर “बी-७”, मानवता आणि निसर्गाच्या प्राकृतिक संसाधनांच्या खासगीकरणाच्या विरोधात “ड्राप बाय ड्राप : वॉटर”, मनुष्याला मनुष्य बनून राहण्यासाठी “गर्भ” , शेतकऱ्यांची  आत्महत्या आणि शेतीच्या होणाऱ्या विनाशावर ‘किसानों का संघर्ष’, कलाकारांना कठपुतली बनवणाऱ्या आर्थिक तंत्रापासून कलाकारांच्या उन्मुक्ततेसाठी नाटक “अनहद नाद-अन हर्ड साउंड्स ऑफ़ युनिवर्स” , शोषण आणि दमनकारी पितृसत्ततेच्या विरुद्ध न्याय, समता आणि समानतेची हुंकार “न्याय के भंवर में भंवरी” , समाजात राजनैतिक चेतना जागवण्यासाठी ‘राजगति’ अशा विविध नाटकांच्या माध्यमातून फॅसिस्टवादी ताकदींशी लढत आहे!
संपूर्ण जगात आता अवकळा पसरली आहे. जागतिकीकरणाच्या अफूने तर्काला नष्ट करून माणसाला आस्थेच्या पुढ्यात नेऊन ठेवले आहे. निर्मम आणि निर्लज्ज भांडवलशाही सत्ता मानवतेला पायाखाली चिरडत आहे. विकास पृथ्वीला गिळत आहे. विज्ञान तंत्राच्या बाजारात देहविक्री सम विकले जात आहे. भारतात याची उदाहरणे टोकावर आहेत आणि समजण्या पलीकडे आहेत. "चमकी बुखार' (मस्तिष्क ज्वर) लहान मुलांच्या मृत्यूची सुनामी आणि चंद्रयानाची भरारी. दहा लाखाचे सूट आणि वस्त्रहीन समाज. लोकतंत्राच्या सुंदरतेला कुरूप करणारे गर्दीतंत्र आणि धनतंत्र. न्यायासाठी दारोदारी भटकणारा समाजातला खालचा वर्ग आणि आपल्या अस्तित्वासाठी लढणारे सुप्रीमकोर्ट. संविधानामूळे स्वतःचे पोट भरणारे कर्मचारी आज आपल्या कर्माने राजनेत्यांची लाथ खाण्यासाठी शापित आहेत. चौथी आर्थिक महासत्ता आणि बेरोजगारांची गर्दी. जेव्हा जेव्हा मानवाचे तंत्र असफल होते, तेव्हा तेव्हा अंधविश्वास आस्थेची चादर ओढून विक्राळ रूप धारण करत, समाजाला गुंडाळून घेतो. लंपट गर्दीच्या जोरावर सत्तेत येतात आणि मीडिया पीआरओ बनते. समाज एका ‘फ्रोजन स्टेट’ मध्ये जातो. ज्याला तोडण्यासाठी माणसाला आपल्या विकारांपासून मुक्तिसाठी ‘विचार आणि विवेकाला' जागवणे आवश्यक आहे. वैचारिकतेचे पेटंट ठेवणारे वामपंथी, जडत्व आणि प्रतिबद्धतेचा फरक नाही समजून घेत. त्यांच्यावर केलेली टीका समजून न घेता थेट प्रतिक्रिया व्यक्त करतात.  गांधीचा राजनैतिक विवेकशील वारसा मातीत मिळाला आहे. अशा वेळी  समाजाच्या ‘फ्रोजन स्टेट’ ला तोडण्यासाठी कलाकारांनी विवेकाच्या मातीत विचारांचे रोपटे लावणे आवश्यक आहे. समाजाच्या 'फ्रोझन स्टेट' ला तोडण्यासाठी "थिएटर ऑफ रेलेवन्स" आपल्या कलात्मकतेने विवेकाच्या मातीत विचाराचे रोप लावण्यासाठी प्रतिबद्ध आहे.
 
 

बातम्या आणखी आहेत...