आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पर्रीकरांना डिस्चार्ज, प्रकृती गंभीर; आता घरीच केले जातील उपचार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांना रविवारी दिल्लीतील एम्स रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. मात्र, अजूनही त्यांची प्रकृती गंभीरच आहे. त्यांच्यावर आता गोव्यात उपचार केले जाणार आहेत. रविवारी सकाळी पर्रीकरांची प्रकृती अधिकच बिघडली. त्यांना काही वेळ आयसीयूत ठेवण्यात आले. त्यानंतर डिस्चार्ज दिला.  स्ट्रेचरवरुनच त्यांना बाहेर आणण्यात आले. स्वादुपिंडाला जडलेल्या गंभीर आजारामुळे त्यांना 15 सप्टेंबर रोजी त्यांना एम्स इस्पितळात दाखल करण्यात आले होते. गेले 28 दिवस ते या रुग्णालयात होते. त्याआधी दोनवेळा अमेरिकेतही त्यानी उपचार घेतलेले आहेत. मुख्यमंत्री कार्यालयाच्या सूत्रांनुसार, आता पर्रीकरांवर गाेव्यातील त्यांच्या घरीच उपचार केले जातील. 

बातम्या आणखी आहेत...