आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गोव्याचे 'गली बॉय' होते मनोहर पर्रीकर, मित्राला वाचवण्यासाठी स्वत: घेतली होती दारू

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


मनोहर पर्रीकर 
जन्म : १३/१२/१९५५ 
निधन : १७/०३/२०१९ 

डॉ. मनोहर गोपालकृष्णन प्रभू पर्रीकर गोव्याचे ४ वेळा मुख्यमंत्री राहिले. प्रथम २००० ते २००२ पर्यंत, दुसऱ्यांदा २००२ ते २००५, तिसऱ्यांदा २०१२ ते २०१४ आणि चौथ्यांदा १४ मार्च २०१७ ते आतापर्यंत ते सीएम होते. २०१७ मध्ये जेव्हा भाजप गोवा विधानसभा निवडणुकीत बहुमतापासून दूर होते, तेव्हा इतर पक्षांनी पर्रीकर यांना सीएम करण्याच्या अटीवरच पाठिंबा दिला होता. त्यामुळे ते पुन्हा दिल्लीहून गोव्याला आले. ते अडीच वर्षे संरक्षणमंत्री होते. पर्रीकर लहानपणापासूनच संघाशी जोडलेले होते. २६ व्या वर्षी ते आपल्या गावाचे संघचालक झाले होते. पहिली लोकसभा निवडणूक १९९१ मध्ये लढले, पण हरले. १९९४ च्या विधानसभा निवडणुकीत ते प्रथम जिंकले. जून १९९९ मध्ये विरोधी नेते झाले. २०१३ ची गोष्ट. गोव्यात भाजपचे अधिवेशन सुरू झाले. संपूर्ण देशात चर्चा होती की मोदी पीएम पदाचे उमेदवार असतील की नाही. कोणीही स्पष्टपणे बोलत नव्हते. याच अधिवेशनाच्या मंचावरून प्रथमच पर्रीकर यांनी मोदींचे नाव पीएम पदासाठी प्रस्तावित केले. मोदी २०१४ मध्ये पंतप्रधान झाले तेव्हा त्यांनी पर्रीकर यांना संरक्षणमंत्रिपद सांभाळावे, असे सांगितले. सुरुवातीला पर्रीकर राजी नव्हते, नंतर त्यांनी २ महिन्यांचा अवधी मागितला आणि नंतर दिल्लीला आले. पर्रीकर यांच्या काळात २८-२९ सप्टेंबर २०१६ रोजी लष्कराने पीओकेत सर्जिकल स्ट्राइक केला होता. 


व्यक्तिमत्त्व : स्कूटरवाला मुख्यमंत्री अशी ओळख 
मनोहर पर्रीकर यांचा साधेपणा सर्वांना आवडत असे. ते मुख्यमंत्री असतानाही स्कूटरने ऑफिसला जात असत. लोक त्यांना स्कूटरवाला मुख्यमंत्री म्हणत होते. पर्रीकरांना हाफ शर्ट आवडत असे. ते व्हीआयपी रेस्तराँऐवजी फुटपाथवर चहा-नाष्टा करत असत. तेथूनच बातम्या मिळवत असत. ते म्हणत असत-सर्व नेत्यांनी चहा स्टॉलवरच चहा प्यावा, राज्याची सर्व माहिती तेथे मिळते. ते रांगेत उभे राहूनच जेवण घेत असत. रांगेत उभे राहूनच आपले काम करून घेत असत. त्यांना हूटर लावलेली वाहने आवडत नव्हती. 


मैत्री : मित्राला वाचवण्यासाठी स्वत: घेतली दारू 
पर्रीकर यांनी एकदा कॉलेजच्या दिवसांचा उल्लेख करताना सांगितले होते की, हॉस्टेलमध्ये माझा एक मित्र सिगारेट, दारू पीत होता, तो ब्राह्मण कुटुंबातील होता. एक दिवस मी त्याच्यासोबत बसलो होतो. त्याच्या हातात सिगारेट आणि एक पेग होता. अचानक खोलीत त्याचे वडील आले. तो घाबरला. मी या गोष्टींना हात लावत नव्हतो, पण त्या दिवशी मी मित्राच्या हातातून सिगारेट-पेग घेऊन बाहेर पडलो. वडील त्याला म्हणाले, 'बेटा, अशा मुलाच्या संगतीत कधीही राहू नकोस.' 


शिक्षण : आयआयटी पास देशाचे पहिले मुख्यमंत्री  :

पर्रीकर सीएम होणारे पहिले आयआयटीयन. १९७८ मध्ये त्यांनी आयआयटी मुंबईहून मेटलर्जिकलमध्ये इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केले. २००१ मध्ये आयआयटीने त्यांना अॅल्युमनी अवॉर्डने सन्मानित केले. 


वाद : २००१ मध्ये संघाच्या ५१ विद्याभारती प्राथमिक शाळा बंद करण्यात आल्या, तेव्हा पर्रीकर वादात अडकले होते. २०१४ मध्ये ब्राझीलमध्ये फुटबाॅल वर्ल्डकप पाहण्यासाठी पर्रीकर यांचे ३ मंत्री गेले होते. त्यावर ८९ लाख खर्च झाले. टीका झाल्यावर म्हणाले- आम्ही सरकारी खर्चाने गेलो नव्हतो. 

 
कुटुंब : पर्रीकरांच्या पत्नीचे नाव मेधा होते. त्यांचे लग्न १९८१ मध्ये झाले होते. पत्नीचे २००१ मध्ये कॅन्सरने निधन झाले. पर्रीकर यांना दोन मुले आहेत. मोठा मुलगा उत्पल इलेक्ट्रिकल इंजिनिअर,तर दुसरा अभिजित व्यवसाय करतो. 

 

पाच वर्षांत मोदी सरकारमधील ४ मंत्र्यांचे निधन: 
पर्रीकर यांच्याआधी गोपीनाथ मुंडे, अनिल दवे, अनंतकुमार यांचे निधन. 

बातम्या आणखी आहेत...