आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा
नवी दिल्ली । गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे रविवारी संध्याकाळी निधन झाले. ते 63 वर्षांचे होते. मागील एक वर्षांपासून स्वादूपिंडाचा कर्करोगाने त्यांना ग्रासले होते. मनोहर पर्रीकर यांचे आयुष्य खूपच साधे होते. मुख्यमंत्री असतांना देखील ते सामान्य नागरिकाप्रमाणे राहत होते. मुख्यमंत्री पदाचा पदभार स्विकारल्यानंतर शासकीय निवासस्थानात न राहता स्वतःच्या घरी पसंत होते. SUV गाडीतून प्रवास करण्याऐवजी ते त्यांच्या जुन्याच Innova गाडीतून प्रवास करत असत. विरोधीपक्ष नेता बनल्यानंतर त्यांना ती Innova ने मिळाली होती.
नेहमी स्वतःच्या विशिष्ट शैलीत दिसायचे पर्रीकर
मनोहर पर्रीकर ऐशोआरामापासून दूरच राहिले. त्यांनी कधीच महागडे सुट-बुट परिधान केले नव्हते. त्यांचा कोणताही देखावा दाखविण्यात विश्वास नव्हता. हाफ स्लीव्ह शर्ट, ट्राउझर आणि साधे फुटविअर असा त्यांचा एक ट्रेडमार्क होता. कोणताही मीटिंग अथवा स्वतःच्या मुलाचे लग्न जरी असले ते नेहमी एका ट्रेडमार्क शैलीतच दिसत होते.
पब्लिक ट्रान्सपोर्टमध्ये प्रवास करणारा नेता
पर्रीकरांनी आपल्या मंत्रीपदाचा कधीही गैरवापर केला नाही. ते नेहमीच कमी खर्चात जीवन जगत असत. गोव्याच्या रस्त्यांवर ते सतत स्कूटरवर फिरत असत त्यामुळे त्यांना स्कूटरवाला नेता म्हणून देखील ओळखले जात होते. त्यांना पब्लिक ट्रान्सपोर्टमधून प्रवास करताना वेगळेपणा वाटत नव्हता. पर्रीकर विमानातून बिझनेस क्लासने नाही तर इकोनॉमी क्लासने प्रवास करत होते.
स्वतःच्या पैशाने भरायचे मोबाइल बिल
एकीकडे अनेक नेतेमंडळी सरकारच्या पैशावर मौजमस्ती करत असतात. तर दुसरीकडे मनोहर पर्रीकर आपल्या मोबाइलचे बिल सरकारी पैशातून नव्हे तर स्वखर्चातून भरत होते. ते आपले इतरही खर्चही स्वतःच्या खिशातून भागवत होते.
भ्रष्टाचाराविरूद्ध कठोर पावले उचलणारा नेता
मनोरह पर्रिकरांचे नाव देशातील मोजक्याच ईमानदार नेत्यांमध्ये सहभागी आहे. भ्रष्टाचार आणि अवैध कामाबाबत ते कडक होते. त्यांनी गोव्यातील भ्रष्टाचार संपविण्यासाठी भ्रष्टाचार यादीत सापडेले अनेक ब्लॉक डेव्हलपमेंट अधिकारी, पंचायत सचीव आणि इतर अधिकाऱ्यांना पदांवरून हटविले होते.
“Goa’s Mr. Clean”
पर्रीकरांनी गोव्यातील अवैध खनन रॅकेट पूर्णपणे उद्ध्वस्त केले होते. या कामगिरीमुळे त्यांना ''मिस्टर क्लीन''चा किताब देण्यात आला. यासाठी त्यांनी अनेक व्यापाऱ्यांचे परवाने रद्द केले होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.